‘भारत-पाक संबंध चर्चेतूनच सुधारतील’
By admin | Published: November 30, 2015 01:09 AM2015-11-30T01:09:07+5:302015-11-30T01:09:07+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सुधारले, तर त्यांचा उपयोग त्यांना दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी होईल, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले.
Next
संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सुधारले, तर त्यांचा उपयोग त्यांना दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी होईल, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले.
भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे. या दोन्ही देशांच्या नेत्यांना मी तुमच्यातील मतभेद हे चर्चेच्या माध्यमातून दूर करावेत आणि त्यासाठी मी सरचिटणीस या नात्याने सहकार्य करीन, असे मून म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शांततेच्या पुढाकारासाठी चार मुद्दे मांडले होते. (वृत्तसंस्था)