भारत-अमेरिका अणुकरार नवीन वर्षात
By admin | Published: December 13, 2015 10:35 PM2015-12-13T22:35:12+5:302015-12-13T22:35:12+5:30
भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात होऊ शकते. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात होऊ शकते. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराबाबत अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत, तर काही पूर्णत्वास जात आहेत. रिचर्ड वर्मा यांनी सांगितले की, मला याची पूर्ण खात्री आहे की, २०१६ मध्ये हा करार कार्यान्वित होईल.
त्यादृष्टीने आम्ही वाटचाल करीत आहोत. भारत आणि अमेरिका संपर्क समूहाची मागील बैठक नोव्हेंबर महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झाली होती.
वर्मा म्हणाले की, आम्ही अणुऊर्जा विभाग, एनपीसीआयएल आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याशी चर्चा केली आहे.
हा करार लवकरच कार्यान्वित करण्यासाठी सर्वच जण इच्छुक आहेत. एका अणु प्रकल्पाची निर्मिती ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. (वृत्तसंस्था)