VIDEO: १६ फूटांच्या अजगराने महिलेला जिवंत गिळले; तीन दिवसांनी पोटातून...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 01:08 PM2024-06-09T13:08:46+5:302024-06-09T13:10:51+5:30
इंडोनेशियामध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा धक्कादायरित्या शोध लागल्याने खळबळ उडाली आहे.
Shocking News : चित्रपटांमध्ये अनेकदा सापाने माणसांना गिळल्याचे सीन दाखवण्यात येतात. जिवंत व्यक्तीला भलेमोठे साप गिळून टाकत असल्याचे दृश्यांमध्ये दाखवतात. मात्र इंडोनेशियामध्ये प्रत्यक्षात अशीच एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. इंडोनेशियात एका महिलेला अजगराने संपूर्ण गिळून टाकले. त्यानंतर गावकऱ्यांनी अजगराचे पोट कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. या वृत्ताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावात हा सगळा प्रकार घडला असून अजगराने गिळलेल्या महिलेची ओळख पटली आहे. मृत महिलेचे नाव फरिदा असून ती शुक्रवारी गावकरी आणि तिच्या पतीला अजगराच्या पोटात सापडली. गावचे प्रमुख सुआर्दी रॉसी यांनी सांगितले की, चार मुलांची आई फरीदा गुरुवारी रात्री बेपत्ता झाली होती आणि ती घरी परतली नाही. त्यानंतर गावातील लोकांनी तिच्यासाठी शोध मोहीम सुरू केली.
गावकऱ्यांनी फरीदाचा शोध सुरु केला असता त्यांना १६ फूट लांबीचा अजगर दिसला, ज्याचे पोट प्रमाणाबाहेर फुगले होते. गावकऱ्यांनी अजगराला पाहून भलताच संशय आला. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांसह मिळून अजगराचे पोट फाडण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी अजगराचे पोट कापायला सुरुवात करताच त्यांना पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे ४५ वर्षांच्या फरीदाचे डोके. यानंतर फरीदा अजगराच्या पोटात ज्या अवस्थेत बेपत्ता झाली होती तशीच सापडली. अजगराने फरीदाला संपूर्ण गिळले होते.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Tragedy struck the village of Kalempang, Indonesia, on June 6, 2024. Farida, a 50-year-old woman, vanished while in the nearby forest.
— Morbid Knowledge (@Morbidful) June 8, 2024
A search party formed by local men ventured into the woods in the following days. Their search led them to a massive, 20-foot python.
The… pic.twitter.com/YmGgDmfpeG
दरम्यान, अजगराने माणसाला गिळल्याच्या घटना क्वचितच ऐकायला मिळतात. पण इंडोनेशियामध्ये गेच्या काही वर्षांत अशा प्रकारे अनेक लोक मरण पावले आहेत. गेल्या वर्षी, आग्नेय सुलावेसीमधील टिनंगगिया जिल्ह्यातील रहिवाशांनी आठ मीटरच्या अजगराला मारून टाकले होते कारण त्याने गावातील एका शेतकऱ्याला मारले आणि गिळले होते. २०१८ मध्ये, दक्षिणपूर्व सुलावेसीच्या मुना शहरात ५४ वर्षीय महिलेला अजगराने गिळले होते. सात मीटर लांब अजगराच्या पोटात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.