मास्क न वापरणारे खोदतायत कोरोनामुळे मरणारांसाठी कबर, अनोख्या शिक्षेमुळे 'हा' देश चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:41 AM2020-09-15T00:41:56+5:302020-09-15T00:44:24+5:30
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे.
जकार्ता - कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक देश मास्कचा वापर करण्याचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, जवळपास सर्वच देशांत, सरकारच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. हेच लोक सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संक्रमाणाची गती वाढवत आहेत. पण, अशा लोकांचा सामना करण्यासाठी इंडोनेशियातील ईस्ट जावा प्रांताने अनोख्या शिक्षेची घोषणा केली आहे.
मास्क लावले नाही, तर खोदावी लागणार कबर -
ईस्ट जावा प्रशासनाने मास्क न लावणाऱ्यांना शिक्षा म्हणून, कोरनामुळे मृत्यू पावणाऱ्यांसाठी कबर खोदण्याचा आदेश दिला आहे. ईस्ट जावातील गेरसिक रिजन्सीच्या आठ लोकांना मास्क लावण्यास नकार दिल्याने, जवळीलच नॉबबेटन गावात एका सार्वजनिक स्मशानभूमीत कबर खोदण्याची शक्षा दिली आहे. हे लोक कुठल्याही रुग्णाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकत नाहीत.
इंडोनेशियात कबर खोदणारांची कमतरता -
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे. अशा शिक्षेमुळे लोक भविष्यात मास्क न लावण्याची चूक करणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सोमवारपासून जकार्तात 14 दिवसांचा लॉकडाउन -
इंडोनेशियात आतापर्यंत 218,382 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 8,723 वर पोहोचला आहे. राजधानी जकार्तात 54,220 लोक कोरोना संक्रमित आहेत. येथे कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारी दोन आठवड्यांकरिता कोरोनासंदर्भातील बंदी लागू झाली आहे. पोलीस मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. तसेच 27 सप्टेंबरपर्यंत सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांवर बंदी राहील. तर काही महत्वाच्या सेवा 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री
"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"
सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा
भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात