बाप रे... इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार, मृतांचा आकडा 384 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 01:33 PM2018-09-29T13:33:45+5:302018-09-29T13:37:42+5:30
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे.
जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 384 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
Indonesia quake-tsunami death toll jumps to 384, reports AFP quoting disaster agency.
— ANI (@ANI) September 29, 2018
जिओफिजिक्स खात्याचे प्रवक्त्याने त्सुनामी आल्याचे सांगितले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मात्र, याबाबत माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
Major tsunami reported to have hit Palu, Indonesia after M 7.5 earthquake today, Sept 28! pic.twitter.com/01pQw4oNCB
— severe-weather.EU (@severeweatherEU) September 28, 2018
इंडोनेशियाच्या एका वृत्त वाहिनीने याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून यामध्ये अजस्त्र लाट उसळल्याचे दिसत आहे. आणि तेथील लोक आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत.
Omg there have earthquake and tsunami in palu Indonesia 😭😭 stay safe everyone #Prayfordonggala#Prayforpalupic.twitter.com/jUBqYJ2ajB
— StarMoonEXO ⭐🌙 (@StarMoonEXO) September 28, 2018