उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:00 PM2021-01-09T20:00:44+5:302021-01-09T20:12:57+5:30

Indonesia Sriwijaya Air Flight 182 : श्रीविजय एअरचे 182 हे विमान एकूण 62 प्रवाशांना घेऊन निघाले होते.

indonesia sriwijaya air flight 182 lost contact after taking off from jakarta | उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू

उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू

googlenewsNext

जकार्ता -  इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता झालं असून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्टनुसार, श्रीविजय एअरचे 182 हे विमान एकूण 62 प्रवाशांना घेऊन निघाले होते. या विमानासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. इंडोनेशियातील सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. 

फ्लाइट रेडार 24 अनुसार, (FlightRadar24) हे विमान तब्बल 26 वर्षे जुन्या बोइंग 737-500 साखळीतील आहे. या विमानाने शनिवारी संध्याकाळी जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटानंतर या विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. रेडारवर हे विमान 10  हजार फुटाच्या उंचीवर एका मिनिटात खाली आल्याचे दिसले. यानंतर या विमानाला मोठा अपघात झाला का याबाबतची शंका वाढली आहे. इंडोनेशिया सरकारने बचाव कार्यासाठी बचाव पथके सक्रिय केली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: indonesia sriwijaya air flight 182 lost contact after taking off from jakarta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.