इंडोनेशियाचे विमान बेपत्ता
By admin | Published: August 16, 2015 10:19 PM2015-08-16T22:19:28+5:302015-08-16T22:19:28+5:30
इंडोनेशियातील पापुआ प्रांताची राजधानी जयपुरा ते ओक्सीबील या ४२ मिनिटांच्या हवाई सफरीवर असलेले त्रिगना एअर सर्व्हिसचे विमान रविवारी दुपारी
जकार्ता : इंडोनेशियातील पापुआ प्रांताची राजधानी जयपुरा ते ओक्सीबील या ४२ मिनिटांच्या हवाई सफरीवर असलेले त्रिगना एअर सर्व्हिसचे विमान रविवारी दुपारी एकाएकी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. चालक पथकासह या विमानात ५४ जण होते.
विमानतळावर उतरण्याच्या नऊ मिनिटे आधी या विमानाचा ओक्सीबील विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. टर्बाईन इंजिन असलेल्या एटीआर-३०० हे विमान जयपुरा ते ओक्सीबील या हवाई मार्गावर उड्डाणावर होते.
इंडोनेशियात अलीकडच्या वर्षात अनेक विमान दुर्घटना झाल्या आहेत. २५ कोटी लोकसंख्या असलेला इंडोनेशिया एअरलाईन बाजाराचा तेजीने विस्तार करीत आहे. तथापि, अनुभवी वैैमानिक, तंत्रज्ञ, वाहतूक नियंत्रक आणि विमानतळावरील तांत्रिक सुविधांच्या अभावामुळे इंडोनेशियाला या कामात फारशी प्रगती करता आलेली नाही.