इंडोनेशियातील त्सुनामीत 400 नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 10:30 AM2018-09-30T10:30:27+5:302018-09-30T13:34:54+5:30
इंडोनेशियातील नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 400 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुकंपामुळे पालू आणि डोंग्गाला या दोन शहरांचे सर्वात अधिक नुकसान झाले आहे. एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
More than 400 people were confirmed killed, many swept away as tsunami waves triggered by a massive earthquake crashed into the Indonesian island of Sulawesi, authorities expect the toll to rise sharply on Sunday as news arrives from remote areas: Reuters
— ANI (@ANI) September 30, 2018
इंडोनेशिया त्सुनामी : पाहा अजस्त्र लाटांनी माजवलेला उत्पात
जिओफिजिक्स खात्याचे प्रवक्त्याने त्सुनामी आल्याचे सांगितले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मात्र, याबाबत माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
Major tsunami reported to have hit Palu, Indonesia after M 7.5 earthquake today, Sept 28! pic.twitter.com/01pQw4oNCB
— severe-weather.EU (@severeweatherEU) September 28, 2018
इंडोनेशियाच्या एका वृत्त वाहिनीने याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून यामध्ये अजस्त्र लाट उसळल्याचे दिसत आहे. आणि तेथील लोक आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत.
Omg there have earthquake and tsunami in palu Indonesia 😭😭 stay safe everyone #Prayfordonggala#Prayforpalupic.twitter.com/jUBqYJ2ajB
— StarMoonEXO ⭐🌙 (@StarMoonEXO) September 28, 2018