सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:30 PM2020-05-21T16:30:08+5:302020-05-21T16:31:36+5:30
अमेरिकेची तालिबानसोबत बोलणी सकारात्मक झाली आहेत. यामुळे काबुलमधील नव्या सरकारमध्ये तालिबान सहभागी होणार आहे. अशावेळी भारताला अफगानिस्तानच्या भावी सरकारसोबच चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला वेल्स यांनी दिला आहे.
लडाख आणि सिक्किममध्ये चीनला लागून असलेल्या भागावर चीनी सैन्यासोबत गेल्या काही दिवसांपासून भारताचा वाद सुरु आहे. यावर अमेरिकेने भारताचे समर्थन केले असून अशाप्रकारचे वाद हे चीनकडून भविष्यात असलेल्या धोक्याची आठवण करून देतात असे म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे दक्षिण आणि पश्चिम आशियाचे विभाग प्रमुख एलिस वेल्स यांनी सांगितले की, चीनच्या उकसविण्यामुळे आणि अन्य देशांना त्रास देण्याच्या वागण्यामुळे एकसारखा विचार करणारे अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देश एकत्र आले आहेत. तसेच अमेरिकेच्या नेत्यांनी अफगानिस्तानमध्ये भारताची भुमिका काय असेल यावरही चर्चा केली आहे. आता दिल्लीला ठरवायचे आहे की, तालिबानसोबत प्रत्यक्ष संबंध ठेवायचे की नाहीत.
अमेरिकेची तालिबानसोबत बोलणी सकारात्मक झाली आहेत. यामुळे काबुलमधील नव्या सरकारमध्ये तालिबान सहभागी होणार आहे. अशावेळी भारताला अफगानिस्तानच्या भावी सरकारसोबच चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला वेल्स यांनी दिला आहे.
भारत-चीनच्या सीमेवरील तणाव आणि चीनकडून होणारा उपद्रव पाहता हा चीनकडून असलेला धोका खरा असल्याचे वाटते. दक्षिण चीन समुद्र असो की भारतीय सीमा, आम्ही तणाव वाढविणारी वृत्ती पाहत आलो आहोत. चीनचे हे कृत्य ते त्यांची वाढती ताकद वापरू इच्छित असल्याचे दर्शविते असेही ते म्हणाले. आता भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत आम्ही चीनविरोधात आहोत. जगात आता चीनविरोधी चर्चा सुरु झाली आहे. चीनचे वर्चस्व असलेली व्यवस्था आम्हाला नको आहे. जगाला फायदा होईल अशी यंत्रणा उभी करायची आहे, असे वेल्स यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली
सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत
CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन
चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक