Inflation in Pakistan: महागाईने पाकिस्तानी नागरिक त्रस्त; 1600 रुपये किलो चहा तर चिकनची किंमत..!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 09:06 PM2023-02-12T21:06:30+5:302023-02-12T21:06:39+5:30
Inflation in Pakistan : आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये महागाईने लोकांचे जगणेही कठीण केले आहे.
Inflation in Pakistan: भीषण आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्येमहागाईने लोकांचे जगणेही कठीण केले आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या एका बातमीचा हवाला देत म्हटले की, कराची शहरासह संपूर्ण पाकिस्तानमध्ये जिवंत कोंबडी आणि कोंबडीच्या मांसाच्या किमतीने नवे किर्तीमान केले आहेत.
तेथील एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले की, कराचीमध्ये सध्या कोंबडीची किंमत 490 रुपये प्रति किलो झाली आहे, तर कोंबडीच्या मांसाची किंमत 720 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. फीडच्या कमतरतेमुळे अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्यामुळे किमतीत ही वाढ झाल्याचे म्हटले आहे. पोल्ट्री व्यवसाय मालकांनी गगनाला भिडलेल्या किमतींमागे चारा टंचाई हे कारण सांगितले आहे.
चिकनच्या किमतीने लोक हैराण
रावळपिंडी, इस्लामाबाद आणि इतर काही शहरांमध्ये कोंबडीची किंमतही सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्याचे वृत्त वाहिनीने म्हटले आहे. एक किलो पोल्ट्री मांस 700-720 रुपयांना विकले जात आहे. दरम्यान, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्या असलेल्या लाहोरमध्ये कोंबडीच्या मांसाची किंमत 550 ते 600 रुपये प्रति किलो झाली आहे. या वाढत्या किमती अनेक ग्राहकांसाठी चिंतेचे कारण बनल्या आहेत. विशेष म्हणजे, कोंबडी हे पाकिस्तानातील मुख्य अन्नांपैकी एक आहे.
चहाच्या किमतीनेही फोडला घाम
पाकिस्तानात गेल्या 15 दिवसांत चहाची किंमत 1,100 रुपयांवरुन 1,600 रुपये प्रति किलो झाली आहे. एका किरकोळ विक्रेत्याने सांगितले की, आघाडीच्या ब्रँडने 170 ग्रॅम दाणेदार आणि वेलची पॅकची किंमत 290 रुपयांवरून 320 आणि 350 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 900 आणि 420 ग्रॅम पॅकची किंमत अनुक्रमे 1,350 आणि 550 रुपयांच्या तुलनेत 1,480 आणि 720 रुपये झाली आहे. इतर कंपन्याही किंमत वाढवण्याच्या तयारीत आहेत