इराणच्या मिसाइल हल्ल्याची माहिती आधीच लीक?; अमेरिकेच्या 'या' युक्तीने वाचला सैन्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 07:20 PM2020-01-08T19:20:09+5:302020-01-08T19:20:45+5:30
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आधुनिक डिटेक्शन यंत्रणेने सैन्यावर होणाऱ्या मिसाइल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता.
बगदाद - इराणी लष्करी कमांडर सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने इराकमधील अमेरिकेतील सैन्य तळांवर मिसाइल हल्ला केला. यात अमेरिकेचे ८० सैन्य मारले गेले असा दावा इराणकडून करण्यात आला. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळत कोणत्याही सैन्याच्या मृत्यूचा अधिकृत दुजोरा दिला नाही. अशातच एक बातमी पुढे येतेय की, इराणकडून होणाऱ्या या हल्ल्याची माहिती अमेरिकेला आधीच कळाली होती. नेमकं अमेरिकेला या हल्ल्याची भनक कशी लागली यावर स्पष्टता नाही.
हल्ल्याच्या काही तासांनंतर इराणी पंतप्रधानांनी सांगितले की मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याची पूर्वकल्पना आधीच होती. इराकी पंतप्रधानांचे प्रवक्त्यांचा दावा आहे की, पंतप्रधान अब्देल तेहरान यांना एक फोन आला होता. यात लष्कर कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण हल्ल्याच्या तयारीत आहे असं सांगण्यात आलं होतं. इराकच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला ही माहिती दिली आहे याबाबत सध्यातरी याची स्पष्टता नाही.
..म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती
इराकच्या पंतप्रधानांचे म्हणणं आहे की, आम्हाला सांगण्यात आलं होतं की अमेरिकन सैन्याचा ठिकाणा टारगेट करण्यात आला आहे पण कोणत्या ठिकाणी हा हल्ला होणार याची स्पष्टता नव्हती. मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून इराकच्या पंतप्रधानांना फोन आला आणि परिस्थितीची माहिती घेण्यात आली.
'ऑल इज वेल' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सूचक इशारा; म्हणाले...
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आधुनिक डिटेक्शन यंत्रणेने सैन्यावर होणाऱ्या मिसाइल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे सैन्याने बंकरमध्ये लपवण्यात आलं होतं. तातडीच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने इराकमधील सैन्याला धोक्याचा इशारा देऊन अलर्ट केलं. अमेरिकेतील मेरीलँड स्थित फोर्टमेडमध्ये मिसाइल लॉन्चिंगला घेऊन अचूक वेळेची सूचना जमा केली जात होती. डेली मेलच्या रिपोर्टनुसार सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिसाइल ६०० मील दूर असताना सैनिकांना इशारा दिला होता त्यानंतर ते बंकरमध्ये जाऊन लपले. इराणने ऐन अल असद आणि एरबिल बेस यावर डझनभर मिसाइल हल्ला केला. दरम्यान इराणने अमेरिकेचे सैन्य मारले हा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला आहे.