सिडनी ओलीसनाट्याची चौकशी सुरू
By admin | Published: December 17, 2014 01:10 AM2014-12-17T01:10:00+5:302014-12-17T01:10:00+5:30
आॅस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एका लोकप्रिय कॅफेत सोमवारी घडलेल्या ओलिस नाट्याची चौकशी सुरु झाली आहे. १७ तासानंतर पोलीस कारवाईनंतर ओलिस नाट्य संपले.
सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एका लोकप्रिय कॅफेत सोमवारी घडलेल्या ओलिस नाट्याची चौकशी सुरु झाली आहे. १७ तासानंतर पोलीस कारवाईनंतर ओलिस नाट्य संपले. यात बंदुकधारी अपहरणकर्त्यासह 3 जण मारले गेले.
स्थानिक माध्यमानुसार, मृतांत लिंट कॅफेचे व्यवस्थापक ३४ वर्षीय टोरी जॉनसन व ३८ वर्षीय एक महिला वकील कॅटरिना डावसन यांचा समावेश आहे. या हल्ल्यात एका पोलीसासह चार जण जखमी झाले. न्यू साऊथ वेल्सच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, या घटनेत १७ जणांना ओलिस ठेवण्यात आले होते.
मृतांना श्रद्धांजली
> आॅस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या नेतृत्वात संपुर्ण देशात सिडनी ओलिस प्रकरणात जीव गमावलेल्या दोन नागरिकांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. अबॉट यांनी सपत्नीक कॅफेला भेट दिली व श्रद्धांजली अपर्ण केली. पंतप्रधानांनी घटनास्थळी ठेवण्यात आलेल्या शोक पुस्तिकेत आपला संदेश लिहला. ‘टोरी जॉनसन व कॅटरिना डावसन यांच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सामील आहोत. हल्ल्यातील मृत हे सर्वसाधारण लोकांप्रमाणेच सभ्य व चांगले नागरिक होते,’ अशा शब्दांत अबॉट यांनी श्रद्धांजली वाहिली.
> शेकडो लोकांनी मार्टिन प्लेसवर मृतांना मेणबत्या पेटवून श्रद्धांजली वाहिली. आॅस्ट्रेलियात ठिकठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले होते. मृतांच्या स्मृतीप्रीत्यर्थ न्यू साऊथ वेल्स येथील सर्व सरकारी इमारतींवरील झेंडे अर्ध्यावर आणण्यात आले आहेत. पोलीस हल्लेखोराच्या उद्देशाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर संपुर्ण आॅस्ट्रेलियात सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणा सर्व स्तरावर कसुन चौकशी करत आहेत.