बलात्कार करण्याची प्रेरणा ही व्यक्तींच्या अनुवांशिकतेतच - सर्वे
By admin | Published: April 10, 2015 05:19 AM2015-04-10T05:19:11+5:302015-04-10T05:19:11+5:30
एखाद्या व्यक्तीला बलात्कार करण्याची जी प्रेरणा मिळते ती त्याच्या अनुवांशिकतेत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १० - एखाद्या व्यक्तीला बलात्कार करण्याची जी प्रेरणा मिळते ती त्याच्या अनुवांशिकतेत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि कारोलिन्सका इन्स्टिट्यूट (स्वीडन )यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या एका सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. १९७३ ते २००९ या ३७ वर्षाच्या कालावधीत झालेल्या लैंगिक गुन्हयांवर सर्वे करण्यात आला असून यामध्ये ही बाब समोर आल्याची माहिती प्रा. सीना फजल यांनी एका इंग्रजी वृत्त दैनिकाला दिली. २१ हजार ५६६ व्यक्तींच्या करण्यात आलेल्या गुन्हयांवर सर्वे करण्यात आला असता लैंगिक अत्याचार करण्यांमध्ये वडिल आणि मुलांचा पाच-पाच वेळेस समावेश असल्याचे आढळले. ४० टक्के लैंगिक गुन्हे हे अनुवांशिकतेमुळे तर ६० टक्के गुन्हयांमध्ये वैयक्तीक आणि पर्यावरण घटकांचा समावेश असल्याचे या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे. नुकत्याच भारतात झालेल्या काही बलात्करांच्या घटनांवरुन माझ्या लक्षात आले की मानसिक आरोग्य आणि गुन्हा यामध्ये समानता आहे. यामध्ये काही अपवादही असल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे.
सर्वेनूसार, लैंगिक गुन्हयांत दोषी न ठरलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अशा प्रकारच्या गुन्हयात त्याचा भाऊ दोषी ठरण्याची शक्यता पाच पटीने अधिक असते असे सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे. तर गुन्हयात दोषी ठरलेल्या वडिलाच्या व्यक्तींची लैंगिक गुन्हा करण्याची शक्यता चार पटीने अधिक असते. आई आणि वडिल तसेच सावत्र भाऊ
यांच्या अनुवांशिकतेत वेगवेगळे प्रमाण असल्याची शक्यता आहे. २.५ टक्के लैंगिक प्रकरणात भाऊ आणि वडिल स्वत: दोषी असतात ही वस्तूस्थिती असून सर्वसाधारण लोकसंख्येच्या तुलनेत यामध्ये ०.५ टक्कयाने वाढ होत आहे असे फजल यांनी सांगितले आहे. एक चतुर्थांस महिला आणि एक दशांस पुरुष त्यांच्या आयुष्यात लैंगिकतेचे बळी पडले असल्याचे या सर्वेमध्ये म्हटले आहे.