Elon Musk यांच्याकडून मिळाली प्रेरणा, 'हा' 33 वर्षांचा तरुण 2 महिन्यांत झाला कोट्यधीश!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:58 PM2021-04-28T16:58:53+5:302021-04-28T17:01:26+5:30
Glauber Contessoto ला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करायची प्रेरणा Tesla चे प्रमूख Elon Musk यांच्याकडून मिळाली. Elon Musk Dogecoin संदर्भात बऱ्याच दिवसांपासून ट्विट करत होते.
Dogecoin नवी क्रिप्टो करन्सी म्हणून वेगाने समोर आली आहे. Dogecoin ने वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. आता एका 33 वर्षांच्या युवकाने यासंदर्भात आपली स्टोरी शेअर केली आहे. तसेच आपण Dogecoin मुळे केवळ दोन महिन्यातच कोट्यधीश झाल्याचे त्याने म्हटले आहे. (Inspired by elon musk 33 years old man invests in dogecoin becomes millionaire)
Dogecoin च्या सहाय्याने कोट्यधीश झाल्याचा दावा Los Angeles चा एक तरूण Glauber Contessoto ने केला आहे. आपण Dogecoin मुळे 15 एप्रिलला कोट्यधीश झालो, असा दावा त्याने केला आहे. यासंदर्भात त्याने एक YouTube व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
Glauber Contessoto ने सांगितले, की फेब्रुवारी महिन्यात Dogecoin ची किंमत 0.045 सेंट्स एवढी होती. तेव्हा त्याने 1,80,000 डॉलर यात इन्हेस्ट केले होते. त्याने कोट्यधीश झाल्याचा पुवावा सादर करत Reddit वर Robinhood होल्डिंगचा स्क्रिनशॉटदेखील शेअर केला आहे. स्क्रिनशॉटसोबत त्याने लिहिले आहे, की तो कोट्यधीश झाला आहे.
Glauber Contessoto ला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करायची प्रेरणा Tesla चे प्रमूख Elon Musk यांच्याकडून मिळाली. Elon Musk Dogecoin संदर्भात बऱ्याच दिवसांपासून ट्विट करत होते. अनेक लोक असेही मानतात, की Elon Musk यांच्या काही ट्विट्समुळेच Dogecoin ची किंमत वाढली आहे. Contessoto म्यूझिक बिझनेसमध्ये काम करतो. तो म्हणाला, अब्जाधीश Elon Musk यांच्यामुळेच त्यांने डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केली. त्याने YouTube व्हिडिओमध्ये दावा केला आहे, की Tesla चे बॉस Elon Musk यांचा Dogecoins सर्क्युलेशनमध्ये जवळपास एक तृतीआंश वाटा आहे.
Glauber Contessoto ने सांगितले, त्याला Dogecoin वर पूर्ण विश्वास आहे. यामुळे त्याला कुटुंबासाठी पैसे वाढविण्यात मदत मिळेल, असा विचार करून त्याने ही जोखीम घेतली. त्याने आपले सर्व शेअर्स आणि सेव्हिंगचे पेसे Robinhood सोबत मार्जीनवर Dogecoin मध्ये इन्व्हेस्ट केले.
Glauber Contessoto ला त्याच्या मित्रांनी आपल्या प्लॅनवर अढळ राहण्यास सांगितले होते. किंमत 1 कोटीच्या पुढे जाताच होल्डिंगच्या 10 टक्के बाहेर काढायचे, असे या लोकांनी ठरवले होते. गेल्या काही आठवड्यांपासून Dogecoin मध्ये मिक्स ट्रेंड बघायला मिळाला. याची किंमत मंगळवारी 21 रुपयांपर्यंत वाढली होती. याचे मार्केट कॅप 1 ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे.