मॉडलने गार्डला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं, आई तुरूंगातून पळून गेली आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:39 PM2021-11-01T12:39:30+5:302021-11-01T12:39:49+5:30
'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, मूळची कोलंबियाची मॉडल विक्टोरिया मेरलानो कथितपणे आपली आई ऐडा मेरलानो रेबोलेडोला तुरूंगातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरली.
एक इन्स्टाग्राम मॉडलने सुरक्षा गार्डला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून तुरूंगात बंद आपल्या आईला सोडवलं. जेव्हा मॉडलने गार्डला बोलण्यात बिझी ठेवलं तेव्हा तिची आई दोरीच्या मदतीने खाली उतरली आणि बाईकस्वारासोबत पळून गेली. मात्र, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि आता मॉडल कोर्टाच्या कारवाईचा सामना करत आहे.
'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, मूळची कोलंबियाची मॉडल विक्टोरिया मेरलानो कथितपणे आपली आई ऐडा मेरलानो रेबोलेडोला तुरूंगातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरली. माजी राजकीय नेता रेबोलेडोला निवडणुकीसंबंधी एका गुन्ह्यात बोगोटा तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. विक्टोरियाने आईला तुरूंगातून पळण्याची योजना आखली होती. आधी तिने आईपर्यंत दोरी पोहोचवली आणि नंतर तुरूंगाच्या गार्डला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं.
ही घटना तेव्हाची आहे जेव्हा २०१९ मध्ये मेरलानो रेबोलेडो एक सीनेटर होती. पण निवडणूक जिंकल्यावर तिला बेकायदेशीर हत्यार, मतदारांची फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. रेबोलेडोला तिच्या विजयाच्या सहा महिन्यातच १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण दोन आठवड्यानंतरच तुरूंगात बाहेर आली. यासाठी तिच्या मुलीने मोठ्या चलाखीने पूर्ण योजना केली होती.
कशी केली योजना?
मॉडलला तिच्या आईला तुरूंगातून पळवून नेण्याची संधी तेव्हा मिळाली जेव्हा रेबोलेडोसाठी एका डेंटीस्टची नियुक्ती करण्यात आली. रेबोलेडो गार्डच्या उपस्थितीत डॉक्टरला भेटण्यासाठी एका रूममध्ये गेली. तिथे तिची मुलगी विक्टोरिया मेरलानो होती. मुलीने कशीदरी आईला दोरी दिली. मग गार्डला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं. ज्यावेळी मॉडल गार्डसोबत बोलत होती तेव्हा तिची आई दोरीच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरली आणि आधीपासून उभ्या असलेल्या बाइकवरून पळून गेली.
तुरूंगातून पळून गेल्यावर मॉडलची आई देश सोडून गेली. नंतर तिला पुन्हा परत कोलंबियाला आणण्यात आलं. आता मुलीविरोधात कोर्टात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी डेंटीस्टरही मदत करण्याचा आरोप आहे. पोलीस अधिकारी म्हणाले की, आतल्या मदतीशिवाय अशाप्रकारची घटना घडणं अशक्य होतं.