बुद्धिमान भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेबाहेर काढायला नको!

By admin | Published: March 16, 2016 08:40 AM2016-03-16T08:40:24+5:302016-03-16T08:40:24+5:30

अमेरिकेत राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या परदेशी व्यक्तींना परत पाठवायला हवे, अशी भूमिका घेणारे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड

Intelligent Indian students should not be taken out of the United States! | बुद्धिमान भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेबाहेर काढायला नको!

बुद्धिमान भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेबाहेर काढायला नको!

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या परदेशी व्यक्तींना परत पाठवायला हवे, अशी भूमिका घेणारे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकेतील शैक्षणिक संस्थात शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढायला नको, देशाला बुिद्धमान व्यक्तींची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारतातील असे अनेक विद्यार्थी आहेत की जे येथील विद्यापीठात शिकतात. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही विद्यार्थी पुन्हा मायदेशी परततात. आपल्या कंपन्या स्थापन करतात आणि अनेकांना रोजगार देतात. त्यामुळे त्यांना बाहेर काढता कामा नये.

एच-१ बी व्हिसाला होता विरोध
- डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच एच-१ बी व्हिसा कार्यक्रम बंद करणार असल्याचे सांगितले आहे.
- अमेरिकी कर्मचाऱ्यांसाठी हा
एच-१ बी व्हिसा अडथळा ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
- अनेक भारतीय आयटी कर्मचारी या एच - १ बी व्हिसाचा उपयोग करतात. त्यामुळे अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळत नसल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते.
- एच-१ बी व्हिसावर बोलताना ते म्हणाले की, काही विद्यार्थी, व्यक्ती शिक्षणासाठी येथे अनेक वर्षे राहतात. अशा विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होताच देशाबाहेर जाण्यास सांगायला नको.

Web Title: Intelligent Indian students should not be taken out of the United States!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.