आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Published: April 30, 2015 01:18 AM2015-04-30T01:18:22+5:302015-04-30T01:18:22+5:30

गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का,

Interaction with farmers in International Agriculture Exhibition | आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

Next

तेल अविव (इस्रायल) : गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का, याचा शोध महाराष्ट्रातील शेतकरी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात घेत आहेत. असे नुकसान झाल्यावर राज्य सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याने आपणच आपला मार्ग शोधलेला बरा, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधून प्रदर्शनाचा हेतू जाणून घेतला.
या प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारासह पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील शेतकरी आले आहेत. मुख्यत: द्राक्ष बागायतदार, डाळिंब, केळी, संत्री अशी फळपिके घेणारे हे शेतकरी आहेत. गारपीट झाल्यास पिकांचे संरक्षण करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्या (अ‍ॅन्टी हेलनेट, अ‍ॅन्टी डस्ट) येथे उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाच्या शेती उपयोगी प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या या कंपन्या आहेत. त्याचा दर, त्याची उपयुक्तता, आयुष्यमान यापासून या जाळ्या लावल्यावर पिकांच्या उत्पादकतेवर त्याचा काय परिणाम होईल का, याची माहिती शेतकरी बारकाईने घेताना दिसले. काही कंपन्यांकडे त्यांनी या प्रकारच्या साहित्याची नोंदणीही केली आहे. संरक्षित शेती पद्धतीच्या दिशेने पाऊल टाकल्यास महाराष्ट्रातील शेतकरीही उत्सुक आहे, हेच त्याचे कारण.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला शेतकरी हा ‘बडा’ शेतकरी आहे. ज्याची सध्याची शेती किफायतशीर आहे व पुन्हा त्याला शेतीकडून जादा उत्पन्न हवे आहे. असे शेतकरी प्रदर्शनात जास्त दिसले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून येण्यासाठी किमान सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो. ड्रीप इरिगेशन आणि शेड नेटमधील मोठ्या कंपन्या, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आदींनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना स्वखर्चाने आणले आहे. पण शेतकऱ्यांना मात्र खर्च द्यावा लागला आहे. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, उद्योजक आणि कृषी पदवीधर झालेले तरुण प्रदर्शनासाठी मुद्दाम आले होते.

Web Title: Interaction with farmers in International Agriculture Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.