कुलभूषण जाधव प्रकरण: पाककडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन; आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:22 PM2019-10-31T13:22:45+5:302019-10-31T13:22:55+5:30

लभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला फटकारलं आहे.

international court of justice slams pakistan kulbhushan jadhav case | कुलभूषण जाधव प्रकरण: पाककडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन; आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फटकारलं

कुलभूषण जाधव प्रकरण: पाककडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन; आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फटकारलं

Next

संयुक्त राष्ट्रे: कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला फटकारलं आहे. कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरून पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठेवला आहे.  आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुलकावी वुसुफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हे सांगितलं आहे. कुलभूषण प्रकरणात 17 जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत ते म्हणाले,   पाकिस्तान कुलभूषण प्रकरणात व्हिएन्ना करारांतर्गत येणाऱ्या कलम 36चं उल्लंघन केलं आहे. या प्रकरणात त्यांनी योग्य पावलं उचलली नसल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.

193 देशांची सदस्यसंख्या असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युसूफ म्हणाले, व्हिएन्ना करारानुसार कायदेशीर मदत देणं बंधनकारक आहे, पण पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना तशी मदत दिलेली नाही. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक केली होती. परंतु व्हिएन्ना करारात हेरगिरीसाठी वेगळ्या अशा कोणत्याही तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे पाकिस्ताननं मदत देणं आवश्यक होतं. 

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला होता. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयानं झटका दिल्यानंतर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस दिला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

कुलभूषण यांना 2016 साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कुलभूषण यांनी  कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला होता. भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्ताननं दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.  

Web Title: international court of justice slams pakistan kulbhushan jadhav case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.