आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर
By admin | Published: August 10, 2014 03:04 AM2014-08-10T03:04:35+5:302014-08-10T03:04:35+5:30
पश्चिम आफ्रिकेत उद्भवलेल्या इबोलाची साथ ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे व या साथीचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.
Next
>जिनिव्हा : पश्चिम आफ्रिकेत उद्भवलेल्या इबोलाची साथ ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे व या साथीचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. यापूर्वी संघटनेने 2क्क्9 मध्ये स्वाईन फ्लूची साथ आणि गेल्या मे महिन्यात पोलिओबद्दल अशीच घोषणा केली होती. येथे संघटनेच्या मुख्य डॉ. मार्गारेट चॅन यांनी संघटनेची ही घोषणा म्हणजे जगाने एक होण्यासाठीचे स्पष्ट आवाहन असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तथापि, अनेक देशांमध्ये इबोलाचे एकही प्रकरण उघडकीस आलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. ज्या देशांमध्ये इबोलाची साथ ज्या प्रमाणात उद्भवली आहे व त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा नाही, असे त्यांनी सांगितले. गेल्या मार्च महिन्यात गुनियात ती उद्भवली. इबोलावर नेमका उपचार किंवा परिणामकारक लस उपलब्ध नाही. इबोलाची लागण झालेल्या रोग्यांच्या मृत्यूचे प्रमाणही 5क् टक्के आहे. गेल्या मे महिन्यात संघटनेने ज्या शिफारशी केल्या होत्या त्यांची त्या त्या देशांनी नीट अंमलबजावणी केली नसल्याचे संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. ही साथ नंतर अनेक देशांत पसरली व पाकिस्तान व कॅमेरूनमध्ये ती भीषण अवस्थेला पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)