विमान अपघाताचा आंतरराष्ट्रीय तपास
By admin | Published: November 1, 2015 11:53 PM2015-11-01T23:53:34+5:302015-11-01T23:53:34+5:30
सिनाई द्वीपकल्पात रशियन विमानाला झालेल्या अपघाताचा रविवारी इजिप्तच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास सुरू झाला
कैरो : सिनाई द्वीपकल्पात रशियन विमानाला झालेल्या अपघाताचा रविवारी इजिप्तच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास सुरू झाला. विमान कर्मचाऱ्यांसह २२४ जणांचा बळी घेणाऱ्या या विमानाचा ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.
हे विमान आम्ही पाडल्याचा दावा इस्लामिक स्टेट आॅफ सिरिया अँड इराकशी (इसिस) संबंध असलेल्या इराकी गटाने केला आहे. इजिप्त आणि रशियाने हा दावा फेटाळला आहे. इजिप्तचे पंतप्रधान शरीफ इस्माईल म्हणाले की,‘‘३० हजार फूट उंचीवरील विमान अतिरेकी पाडू शकणार नाहीत, याला तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे. रशियाचे वाहतूकमंत्री मॅक्सीम सोकोलोव्ह यांनी आयएसचा दावा अचूक नाही, असे म्हटले.’’ तपासात इजिप्तला रशिया आणि फ्रान्सची मदत आहे. (वृत्तसंस्था)