International: महिलांना स्विमिंग पूलमध्ये ‘टॉपलेस’ पोहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:28 AM2023-06-30T07:28:41+5:302023-06-30T07:28:51+5:30
International: स्पेन सरकारने कॅटालोनिया प्रदेशात महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होत पोहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत महिला अनेक दिवसांपासून मागणी करत होत्या.
माद्रिद : स्पेन सरकारने कॅटालोनिया प्रदेशात महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होत पोहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत महिला अनेक दिवसांपासून मागणी करत होत्या.
येथे अशी मान्यता ‘कॅटलन समानता कायदा २०२०’ अंतर्गत आधीच देण्यात आली होती. मात्र तरीही काही स्विमिंग पूलमध्ये महिलांना टॉपलेस पोहण्यास बंदी घातली हाेती. त्यामुळे याबाबत अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. महिलांनी सांगितले की, जर पुरुष पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करत असतील तर त्यांनाही तशी परवानगी द्यावी. प्रत्येक माणसाचा त्याच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे आणि तो त्याला आवडेल त्या पद्धतीने स्नान करू शकतो, असा विचार कायदा आणताना करण्यात आला होता. ज्या महिलांना फुल बॉडी स्विम सूट घालायचा आहे त्यांनाही यातून सूट दिली जाईल.
स्तनपानालाही परवानगी
स्पेनमध्ये सरकारने महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याची परवानगीही दिली आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महिला आपल्या बाळाला स्तनपान करू शकतात.
...तर ४.५० कोटी दंड
कायद्यांचे पालन करण्याबाबत सरकार अत्यंत कठोर आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने एखाद्या नागरिकाला टॉपलेस आंघोळ करण्यास किंवा स्तनपानास रोखल्यास, त्याला ४.५० कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.