शाळांतून शिकविली जाते ‘असहिष्णुता’

By admin | Published: April 17, 2016 03:14 AM2016-04-17T03:14:46+5:302016-04-17T03:14:46+5:30

हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी या अल्पसंख्याक मुस्लिमेतर धर्मीयांविरुद्ध पाकिस्तानातील शाळांतून असहिष्णुतेचे धडे दिले जात असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे.

'Intolerance' taught in schools | शाळांतून शिकविली जाते ‘असहिष्णुता’

शाळांतून शिकविली जाते ‘असहिष्णुता’

Next

लंडन : हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी या अल्पसंख्याक मुस्लिमेतर धर्मीयांविरुद्ध पाकिस्तानातील शाळांतून असहिष्णुतेचे धडे दिले जात असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे.
यू एस कमिशन आॅन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (यूएससीआयआरएफ) पुरस्कृत अभ्यासात पाकिस्तानातील शाळांतून विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पाकिस्तानात असलेले हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी हे सर्व बिगर मुस्लिम अल्पसंख्याक धर्म अविश्वासू, धार्मिकदृष्ट्या घुसखोर, बाहेरचे आणि वैचारिकदृष्ट्या कारस्थानी असल्याची शिकवण पाठ्यपुस्तकातून दिली जाते. पाकिस्तानात असलेल्या चारही प्रमुख प्रांतातील पाचवी ते दहावी वर्गाच्या ७८ पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रमांचे विश्लेषण करण्यात आले असताना ही बाब आढळून आली. विशेष म्हणजे पाकिस्तानातीलच ‘पीस अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन’ (पीईएफ) या स्वयंसेवी संस्थेनेच हा अभ्यास केला आहे. या सर्वच पुस्तकातून इतर धर्मीयांविरुद्ध पक्षपाताची शिकवण दिली जात असल्याची किमान ७० प्रकरणे आढळली आहेत. विशेष म्हणजे २०११ मध्येच हा अभ्यास करण्यात आला आहे. जवळपास सर्वच पाठ्यपुस्तकातून ‘दासदायक’ बाबी आढळल्याचे हा अहवाल म्हणतो. हा अभ्यास जारी करताना यूएससीआयआरएफचे चेअरमन रॉबर्ट पी जॉर्ज म्हणाले की, पाठ्यपुस्तकातून ही असहिष्णुतेची शिकवण देताना ऐतिहासिक ‘वस्तुस्थितीकडे’ दुर्लक्ष करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Intolerance' taught in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.