लैंगिक संबंधांमुळेही जिकाची लागण
By admin | Published: February 4, 2016 03:04 AM2016-02-04T03:04:49+5:302016-02-04T03:04:49+5:30
लैंगिक संबंधांमुळे जिका विषाणू पसरले असल्याचे अमेरिकेच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. लहान मुलांमध्ये बळावत असलेला हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मियामी : लैंगिक संबंधांमुळे जिका विषाणू पसरले असल्याचे अमेरिकेच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. लहान मुलांमध्ये बळावत असलेला हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टेक्सासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लॅटिन अमेरिकेत हा भयंकर आजार पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. आमच्या जवळ या भीतीचे ठोस पुरावे आहेत. हा विषाणू केवळ उष्णकटिबंधीय डासांमुळेच नाही, तर लैंगिक संबंधांमुळेही पसरतो. अमेरिका, कॅनडा आणि युरोपसाठी हा धोक्याचा इशारा आहे. ज्या भागात जिकाची लागण झाली आहे तेथील दौरा करून आलेल्यांचा अमेरिका, युरोप व कॅनडामध्ये संचार आहे.
डल्लास प्रांताने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी जिकाची लागण झालेल्या देशाचा प्रवास करून आलेल्या आजारी व्यक्तीशी ज्याचे लैंगिक संबंध आले त्यालाही त्याची लागण झाली. व्हेनेझुएलाहून आलेल्या कोणा व्यक्तीमध्ये जिकाचा विषाणू आढळला. जिकाची दुसरी घटनाही व्हेनेझुएलाहून आलेल्या व्यक्तीशीच संबंधित आहे. युएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे संचालक डॉ. टॉम फ्रिडेन यांनी जिकाची लागण टेक्सासमध्ये लैंगिक संबंधांतून झाल्याची माहिती ई-मेलद्वारे दिली. जिकाचे पहिले प्रकरण १९४७ मध्ये युगांडामध्ये समोर आले होते. याची लक्षणे म्हणजे हलका फ्लू आणि ताप अशी आहेत. गेल्या वर्षी लॅटिन अमेरिकन देश विशेषत: ब्राझीलमध्ये त्याचा फैलाव वेगाने होत आहे व त्यामुळे छोट्या डोक्याच्या मुलांचा जन्म होत आहे. (वृत्तसंस्था)
1 वॉशिंग्टन : मानवी आरोग्याच्या दृष्टीने अवघ्या जगाची काळजी वाढविणाऱ्या ‘जिका’ या घातक विषाणूने अमेरिकेसह जगभरातील २३ देशांत हातपाय पसरले आहेत. एवढ्या झपाट्याने जिका या विषाणूचा फैलाव कसा झाला? याचा छडा लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, उच्च तापमानामुळे डासांमार्फत जिका या विषाणूंनी एवढ्या झपाट्याने अनेक देशांना विळखा घातला आहे.
2 शास्त्रज्ञ म्हणतात की, वाढते तापमान आणि एडिस इजिप्ती डासाच्या जीवनचक्राचा निकटचा संबंध आहे. उच्च तापमानामुळे या डासांमार्फत जिका विषाणंंूचा झपाट्याने प्रसार आणि प्रादुर्भाव होतो, असे युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया डेव्हिसचे कीटकशास्त्रज्ञ बिल रेईज यांनी सांगितले.
४ हजार जणांना लागण
४ब्रासिलिया : डासामधील ‘जिका’ या विषाणूची ब्राझीलमध्ये ४ हजार लोकांना लागण झाली आहे. ४,७८३ जणांना या विषाणूची लागण झाल्याचा संशय होता. त्यापैकी ७०९ प्रकरणे नकारात्मक निघाली.