ब्रसेल्सवरील हल्लेखोरांनी बेल्जिअमच्या पंतप्रधानांचा पत्ता मिळवण्यासाठी केला इंटरनेटचा वापर

By admin | Published: March 30, 2016 04:39 PM2016-03-30T16:39:16+5:302016-03-30T16:39:16+5:30

ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला करणा-या हल्लेखोरांनी इंटरनेटद्वारे बेल्जिअमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांच्या घराचा आणि कार्यालयाचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे

The invaders used to get the address of Belgian Prime Minister of Brussels | ब्रसेल्सवरील हल्लेखोरांनी बेल्जिअमच्या पंतप्रधानांचा पत्ता मिळवण्यासाठी केला इंटरनेटचा वापर

ब्रसेल्सवरील हल्लेखोरांनी बेल्जिअमच्या पंतप्रधानांचा पत्ता मिळवण्यासाठी केला इंटरनेटचा वापर

Next
>ऑनलाइन लोकमत - 
ब्रसेल्स, दि. ३० - ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला करणा-या हल्लेखोरांनी इंटरनेटद्वारे बेल्जिअमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांच्या घराचा आणि कार्यालयाचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी कच-याच्या डब्यात टाकलेल्या संगणकामधून ही माहिती मिळाली आहे. 
 
या संगणकामधून हल्ल्यासंबंधी महत्वाची माहिती मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हल्लेखोराने टाकलेला शेवटचा संदेशही या संगणकामधून मिळाला आहे. इब्राहिम अल बक्रोई याने हल्ल्यानंतर संगणक कचरापेटीत टाकला होता. यामध्ये त्याने त आपली ‘शिकार झाली आहे तसंच सुरक्षित वाटत नसल्याचं' लिहिले होते. अटक करण्यात आलेला पॅरिस हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सलाह अब्देस्लाम याच्यासारखी माझी गत होऊ नये असे मला वाटते, असेही इब्राहिमने म्हंटले होते. 

Web Title: The invaders used to get the address of Belgian Prime Minister of Brussels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.