तुरुंगावर हल्ल्याचा कट उधळला

By admin | Published: December 27, 2014 12:25 AM2014-12-27T00:25:43+5:302014-12-27T00:25:43+5:30

पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने तुरुंगावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. लाहोर येथील कोट लखपत तुरुंगावर

The invasion of the prison was cut off | तुरुंगावर हल्ल्याचा कट उधळला

तुरुंगावर हल्ल्याचा कट उधळला

Next

लाहोर : पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने तुरुंगावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. लाहोर येथील कोट लखपत तुरुंगावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. या तुरुंगात फाशीची शिक्षा झालेले ५० दहशतवादी असून, त्यातील ५ जण कट्टर अतिरेकी आहेत. या हल्ल्याप्रकरणी दोन महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे.
आम्ही कोट लखपत तुरुंगावर हल्ला करण्याचा कट उधळला असून तुरुंगाजवळील फरीदकोट वसाहतीतून दोन महिला व एका पुरुषाला अटक केली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या आरोपीकडून रॉकेट प्रक्षेपक, सुरक्षा सैनिकांचे गणवेश, धनुष्यबाण व सीमकार्डे जप्त करण्यात आलेली आहेत. कोट लखपत तुरुंगातील उमर नदीम, अहसान अझीम, अमीर युसुफ, असीफ इद्रिस व कामरान या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर चिनाब नदीवरील लष्करी छावणी तसेच मुलतान येथील आयएसआयचे कार्यालय यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The invasion of the prison was cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.