मोदींना अमेरिकी संसदेत आमंत्रित करा
By Admin | Published: June 22, 2014 01:58 AM2014-06-22T01:58:26+5:302014-06-22T18:46:08+5:30
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रमध्ये भाषणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी दोन संसद सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोएनर यांच्याकडे केली आहे.
>वॉशिंग्टन : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित अमेरिका दौ:यादरम्यान अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रमध्ये भाषणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी दोन संसद सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोएनर यांच्याकडे केली आहे.
अमेरिकी काँग्रेसचे सदस्य एड रॉइस व जॉर्ज होल्डिंग यांनी बोएनर यांना पत्र पाठवून मोदींचे संसदेत भाषण आयोजित करण्याची मागणी केली आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे.
पत्रत उभय संसद सदस्यांनी म्हटले आहे की, भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण मित्रदेश असून तो दक्षिण आशियाई क्षेत्रतील एक महत्त्वाचा भागीदार आहे, असे नमूद करून एकविसाव्या शतकात भारत-अमेरिका संबंध खूपच महत्त्वपूर्ण रहातील, या अध्यक्ष ओबामांच्या विधानाचाही दाखला दिला आहे. 2क्क्2 च्या दंगलीनंतर अमेरिकेने मोदींना व्हीसा न देण्याचे धोरण अवलंबले होते. अगदी मोदींना भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करेर्पयत अमेरिकेच्या या भूमिकेत बदल झाला नव्हता. मात्र, मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर अमेरिकी संसद सदस्य त्यांना थेट संसदेत भाषणासाठी आमंत्रित करण्याची मागणी करू लागले आहेत हे उल्लेखनीय. (वृत्तसंस्था)