दररोज साडेनऊ तासांच्या बैठकीने मृत्युला निमंत्रण, संशोधनात्मक अध्ययनातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 05:22 AM2019-08-23T05:22:59+5:302019-08-23T05:25:04+5:30
गतिमान शारीरिक सक्रियतेता मध्यमवयीन आणि वयस्क लोकांचा लवकर मृत्यू होण्याच्या जोखीम कमी होते.
लंडन : झोपेची वेळ सोडून दिवसभरात साडेनऊ तास बसून राहिल्यास लवकर मृत्यू होण्याची जोखीम वाढू शकते, असा दावा ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकातील प्रकाशित संशोधनात्मक अध्ययनाच्या निष्कर्षात करण्यात आला आहे. तथापि, या निष्कर्षानुसार दररोज २४ मिनिटे गतीने चालणे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
गतिमान शारीरिक सक्रियतेता मध्यमवयीन आणि वयस्क लोकांचा लवकर मृत्यू होण्याच्या जोखीम कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८ ते ६४ वर्षे वयाच्या लोकांनी दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे किंवा किमान ७५ मिनिटे जोमाने शारीरिक हालचाली करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, हा सल्ला स्वत: अंगीकारलेल्या हालचालींवर आधारित आहे. तथापि, कोणत्या वयात शारीरिक हालचाली जास्त कराव्यात, त्याची तीव्रता किती असावी, याबाबतच कोणतेही मापदंड नाहीत. नॉर्वेतील ओस्लोस्थित नॉर्वेजियन स्कूल आॅफ स्पोर्ट सायन्सेसचे प्रोफेसर उल्फ एकेलुंद यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी शारीरिक हालचाली आणि हालचालीरहित वेळ आणि मृत्यूस कारक घटक यांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण केले आहे. यात एक्सेलेरोमीटरचा (प्रवेगमापक) वापर करण्यात आला. हे उपकरण शरीरावर बांधून जागेपणातील हालचालींची गती आणि तीव्रतेचा माग घेत दैनंदिन हालचालीचे प्रमाण मोजले जाते.