आयफोन ७ने घेतला पेट

By admin | Published: October 23, 2016 04:34 AM2016-10-23T04:34:15+5:302016-10-23T04:34:15+5:30

सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणेच अ‍ॅपलच्या आयफोन ७ ला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. आॅस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्समध्ये ही घटना घडली. मॅट जोन्स यांनी

IPhone 7 took belly | आयफोन ७ने घेतला पेट

आयफोन ७ने घेतला पेट

Next

सिडनी : सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणेच अ‍ॅपलच्या आयफोन ७ ला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. आॅस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्समध्ये ही घटना घडली. मॅट जोन्स यांनी आयफोन ७ च्या स्फोटामुळे कारला आग लागल्याचा दावा केला आहे.
मॅट जोन्स आपली कार न्यू साउथ वेल्सच्या रस्त्यावर पार्क करून फिरण्यासाठी बाहेर पडले. बाहेर निघताना त्यांनी आयफोन ७ एका कापडामध्ये गुंडाळून ठेवला होता. ते परत आले, तेव्हा त्यांना कारमधून धूर येताना दिसला. कापडामध्ये गुंडाळलेला आयफोन जळत होता. आयफोन ७ मुळे आग लागून आपल्या गाडीच्या इंटेरिअरचे नुकसान झाल्याचा आरोप मॅट जोन्स यांनी केला आहे. ज्या कापडात आयफोन ७ ठेवला होता, ते कापड उघडले असता, आत ठेवलेला फोन पूर्णपणे वितळल्याचे दिसून आले, असे जोन्स यांनी सांगितले. अ‍ॅपलच्या या फोनबद्दल या पूर्वीही तक्रारी आल्या आहेत. अ‍ॅपलला या घटनांची माहिती असून, अचानक फोन पेट घेण्याच्या घटना का घडत आहेत, त्याचा अ‍ॅपल तपास करत आहे. (वृत्तसंस्था)

महागड्या वस्तूंचा काय उपयोग?
आयफोनला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी सप्टेंबर महिन्यातही आयफोन ७ प्लसचा स्फोट झाल्याचे वृत्त होते. त्या आधी सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट ७ या स्मार्ट फोनलाही खराब बॅटरीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकी महागडी वस्तू घेऊनही सुरक्षा मिळत नसेल, तर काय उपयोग, असा युजर्सचा सवाल आहे.

Web Title: IPhone 7 took belly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.