इराण-इंग्लंड संबंध सुधारले; चार वर्षांनंतर तेहरानमध्ये ब्रिटीश दुतावास

By admin | Published: August 23, 2015 11:32 PM2015-08-23T23:32:37+5:302015-08-23T23:32:37+5:30

मागील आठवड्यामध्ये अमेरिका व क्युबाने आपले संबंध सुधारत एकमेकांच्या राजधानीत दुतावास सुरू केले होते. त्याप्रमाणेच आता इराण व इंग्लंडने

Iran-England relations improved; Four years later, British High Commission in Tehran | इराण-इंग्लंड संबंध सुधारले; चार वर्षांनंतर तेहरानमध्ये ब्रिटीश दुतावास

इराण-इंग्लंड संबंध सुधारले; चार वर्षांनंतर तेहरानमध्ये ब्रिटीश दुतावास

Next

तेहरान : मागील आठवड्यामध्ये अमेरिका व क्युबाने आपले संबंध सुधारत एकमेकांच्या राजधानीत दुतावास सुरू केले होते. त्याप्रमाणेच आता इराण व इंग्लंडने गेली चार वर्षे ठप्प झालेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दूतावास सुरू केले. २०११ साली तेहरानमधील
दूतावासासमोर निदर्शने होऊन हल्लाबोल केल्यानंतर तेथील दूतावास बंदच करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला होता.
तेहरानमधील दुतावास सुरु करण्याच्या प्रसंगी इंग्लंडच्या सेक्रेटरी आॅफ फॉरेन फिलिप हॅमंड यांनी स्वत: इराणमध्ये जाऊन या घटनेचा साक्षीदर होण्याचे ठरविले.
तेहरान येथील दुतावास सुरु झाल्यानंतर हॅमंड यांनी आनंद व्यक्त केला आणि दोन्ही देशांच्या संबंधामध्ये आज मैलाचा दगड प्रस्थापित झाला असेही टिष्ट्वटरवरून टिष्ट्वट केले.

इराण- इंग्लंडचे संबंध
१९७९ : इस्लामिक क्रांतीनंतर इंग्लंडने तेहरान दूतावास बंद केला
१९८० : बंदुकधारी सहा इराणींनी लंडंनमधील इराणच्या दूतावासाचा ताबा घेऊन २६ लोकांना बंदी बनविले होते. याप्रसंगी दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले. दहशत माजविणाऱ्यांनी एका बंद्यास मारुन खिडकीतून बाहेर फेकले होते.
१९८८ : तेहरान
दुतावास पुन्हा सुरू
१९८९ : सॅटनिक व्हर्सेस लिहिणाऱ्या सलमान रश्दींना मारण्याचा अयातुल्ला खोमेनींचा फतवा. रश्दी इंग्लंÞडच्या आश्रयास असल्यामुळे पुन्हा तणाव
२००१ : इस्लामिक क्रांतीनंतर इराणला भेट देणारे जॅक स्ट्रॉ पहिलेच फॉरेन सेक्रेटरी ठरले.
२००४ : इराक कारवाईवेळेस, इराकमधील शियांच्या पवित्र शहरांमध्ये सैन्य उतरल्यामुळे इराणी जनता नाराज, दूतावासासमोर निदर्शने. इराणने इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (आयएइए) ला सहकार्य न केल्याच्या पार्श्वभूमिवर जर्मनी, फ्रान्स,
इंग्लंडने इराणच्या भूमिकेवर टीकात्मक मसुदा तयार केला.
२००९ : इंग्लंड ही जगातील
उद्धट शक्तींपैकी सर्वात वाईट शक्ती असल्याचे खोमेनींचे वक्तव्य
२०११ : आयएईएच्या अहवालानंतर संबंध तोडण्याचा इंग्लंडचा निर्णय. ब्रिटिश राजदुताने इराण सोडावा असा ठराव इराणी संसदेने केला व दोन दिवसांनंतर ब्रिटीश दूतावासासमोर निदर्शने केली. व दुतावासावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराणी मुत्सद्यांना इंग्लंडबाहेर जाण्यास ब्रिटिश सरकारने ४८ तासांची मुदत दिली.
२०१५ : अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन यांच्याबरोबर इराणचा करार, दोन्ही देशानी एकमेकांच्या राजधानीमध्ये दूतावास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार फिलीप हॅॅमंड यांची इराण भेट झाली आहे.

रुहानी इफेक्ट
इंग्लंड आणि इराणमध्ये दूतावास उघडून संबंध पुन्हा प्रस्थापित होण्यामागे इराणमधील नव्या सरकारची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येते. २०१३ साली हसन रुहानी अहमदेजिनादना हरवून राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य देश, रशियाशी संबंध सुधारण्यावर भर दिला. अमेरिकेबरोबरच्या अणुकरारापाठोपाठ इतरही सकारात्मक पावले उचलल्यामुळे त्यांची पाठ थोपटली जात आहे.

(वृत्तसंस्था)

Web Title: Iran-England relations improved; Four years later, British High Commission in Tehran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.