मोठा दावा...! अमेरिका-इस्रायल करू शकतात इराणच्या 'न्युक्लियर' ठिकानांवर हल्ला, 'हाय अलर्ट' जारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 22:20 IST2025-02-25T22:20:05+5:302025-02-25T22:20:24+5:30
...यापार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या 'न्युक्लियर' ठिकानांसभोवतालची सुरक्षाही वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी, तेथे एअर डिफेन्स सिस्टिमही तैनात केले असल्याची माहिती, ब्रिटनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिली

प्रतिकात्मक फोटो
अमेरिका आणि इस्रालय कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात, या भीतीने सध्या इराण अस्वस्थ आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या 'न्युक्लियर' ठिकानांसभोवतालची सुरक्षाही वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी, तेथे एअर डिफेन्स सिस्टिमही तैनात केले असल्याची माहिती, ब्रिटनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिली आहे.
यापूर्वी, अमेरिकन गुप्तचर संस्थांनीही इराणच्या मुख्य न्युक्लियर ठिकाणांवर हल्ला करण्याच्या इस्रायलच्या योजनेसंदर्भात, ज्यो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला माहिती दिली होती. संबंधित वृत्तानुसार, इराण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्युक्लियर ठिकाणांचे संरक्षण करत आहे. मात्र गेल्या वर्षी इस्रायलने केलेल्या पहिल्या हल्ल्यानंतर यात आणखी वाढ झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संभाव्य संयुक्त लष्करी कारवाईच्या भीतीने इराणने हे पाऊल उचलले आहे.
इराणच्या प्रत्येक शहरात हाय अलर्ट -
अमेरिकन वृत्तसंस्था एक्सियोसच्या वृत्तानुसार, इस्रायलने तेहरान जवळली परचिन सैन्य परिसरात हवाई हल्ले केले. टेलीग्राफ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "ते केवळ हल्ल्याची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, जी ठिकाणं कुणाला माहीत नाहीत अशा ठाकाणांवरही हय अलर्ट जारी करण्यात आला आहे."
अमेरिकेने लादले आहेत निर्बंध -
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादले आहेत. या धोरणाअंतर्गत, अमेरिकेने इराण आणि जागतिक शक्तींमधील २०१५ च्या अणुकरारापासून एकतर्फी माघार घेतली आणि तेहरानवर अण्वस्त्रे विकसित करण्याचा आरोप केला. दरम्यान, तेहरानने सातत्याने हा आरोप फेटाळून लावला आहे.