सीरियात इस्राईल व इराण आमनेसामने, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रांचा मारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 09:50 AM2018-05-10T09:50:26+5:302018-05-10T10:48:59+5:30
सीरियामध्ये इस्राईल आणि इराण आमने-सामने उभे ठाकले आहेत.
दमास्कस - सीरियामध्ये इस्राईल आणि इराण आमने-सामने उभे ठाकले आहेत. इराणी सुरक्षादलाकडून सीरिया बॉर्डरवर त्यांच्या सैन्य केंद्रांवर निशाणा साधण्यात आल्याचा आरोप इस्राईलनं केला आहे. अधिकृतरित्या इस्राईलच्या ताब्यात असलेल्या गोलन हाईट्स परिसरात इराणकडून सीरियाजवळील सीमेवर त्यांच्या सैन्य केंद्रांवर हल्ला करण्यात आला, यादरम्यान 20 रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, असा दावा नेतन्याहू सरकारनं केला आहे. तर दुसरीकडे इस्राईलनं क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप सीरियानंदेखील केला आहे.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रशियाच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी, इराणपासून आपले संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क इस्राईलला आहे, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर म्हटले.
सीरियानं केला हल्ल्याचा आरोप
दमास्कसच्या सीमेजवळ इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा सीरियाच्या सरकारी मीडियानं केला आहे.
Israel says it has hit dozens of Iranian military targets in Syria, including the origin of a rocket attack on the Israeli army in the Golan Heights: AFP news agency
— ANI (@ANI) May 10, 2018
Israeli military says it struck dozens of Iranian military targets in Syria overnight: The Associated Press
— ANI (@ANI) May 10, 2018