Iran: प्रथमच हिजाबविरोधी आंदोलकाला फाशी! तेहरान कोर्टाचा निकाल; पाच जणांना कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 09:13 AM2022-11-15T09:13:42+5:302022-11-15T09:14:45+5:30
anti-hijab protest : इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने अजूनही सुरूच आहेत. १६ सप्टेंबर रोजी ही निदर्शने सुरू झाली होती. दरम्यान, या आंदोलनात सहभागी एका व्यक्तीला तेहरान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
तेहरान : इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने अजूनही सुरूच आहेत. १६ सप्टेंबर रोजी ही निदर्शने सुरू झाली होती. दरम्यान, या आंदोलनात सहभागी एका व्यक्तीला तेहरान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीवर इमारतींना आग लावणे, दंगली भडकविणे व कट रचणे असे आरोप ठेवण्यात आले होते. अन्य पाच जणांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
रविवारी निदर्शनांत सहभागी झाल्याबद्दल ७५०हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सप्टेंबरमध्ये निदर्शने सुरू झाल्यापासून तेहरानमध्ये दोन हजाराहून अधिक लोकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
वाद कशामुळे ?
१६ सप्टेंबर रोजी पोलिस कोठडीत २२ वर्षीय महसा अमिनी हिचा मृत्यू झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले होते. १३ सप्टेंबरला अमिनी तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तेहरानला आली होती. तिने हिजाब घातला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तिला अटक केली. या अटकेनंतर तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला.
अनेक आंदोलक ठार
हिजाबविरोधी आंदोलनात सहभागी असल्याबद्दल अनेकांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याविरोधात निदर्शने करणाऱ्यांना अटक करून मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, पोलिसांनी हे दावे फेटाळले.