इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:32 PM2024-10-02T15:32:14+5:302024-10-02T15:33:23+5:30
इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढत असून मंगळवारी इराणने शेकडो क्षेपणास्त्रांनी इस्त्रायलवर हल्ला केला.
तेल अवीव - इराणनं मंगळवारी इस्त्रायलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्राचा मारा केला. या भीषण हल्ल्यासोबतच पुन्हा एकदा जगाचं लक्ष इस्त्रायलच्या त्या मित्रांवर गेले जे प्रत्येकवेळी इस्त्रायलला वाचवत आले. हे मित्र इस्त्रायलचे सुरक्षा कवच आहेत. हे इस्त्रायलला रॉकेट, क्रूज मिसाईल, बॅलेस्टिक मिसाईल या हल्ल्यापासून वाचवत होते. इस्त्रायलचं आयरन डोम मिसाइल सिस्टम सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ज्याबाबत लोकांनी ऐकलं आहे.
मात्र इस्त्रायलजवळ यापेक्षाही घातक शस्त्रे आहेत जे मिसाईलला हवेतच उद्ध्वस्त करतात. प्रत्येक मिसाईल डिफेन्स सिस्टम रॉकेटविरोधात चालते. आयरन डोम सिस्टमचा वापर हिजबुल्लाह आणि हमास दोघांविरोधात इस्त्रायलवर डागलेल्या रॉकेटचा मारा करण्यासाठी वापरले गेले. या रॉकेटमध्ये विस्फोटक असते जे अंधाधुंद हल्ला करते. त्यात कुठल्याही प्रकारे गाइडेंस सिस्टम लावलेले नसते. मागील वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने इस्त्रायलवर याचप्रकारे रॉकेटला हल्ला केला होता.
आयरन डोम कसं करतं काम?
इस्त्रायलजवळ संपूर्ण देशात आयरन डोमच्या १० बॅटरी आहेत. प्रत्येक बॅटरीसोबत एक रडार लावलेला असतो, जो रॉकेटचा शोध घेतो. कमांड अँन्ड कंट्रोल सिस्टम रॉकेटची दिशा, वेग आणि त्यातून होणारे नुकसान याची माहिती देतो. आयरन डोम सर्व रॉकेटला उद्ध्वस्त करू शकत नाही मात्र जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी पडणाऱ्या रॉकेटला संपवू शकतो. मात्र देशाच्या मिसाईल डिफेन्स ऑर्गनायझेशनचं (IMDO) म्हणणं आहे की, आयरन डोम हा इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षणाचा सर्वात खालचा थर आहे. इस्रायलकडे अधिक उंची, लांब पल्ल्याची, जलद गतीने जाणारी आणि अचूक निशाणा साधणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना लक्ष्य करण्यासाठी अनेक संरक्षण प्रणाली आहे.
डेव्हिड स्लिंग क्षेपणास्त्र प्रणाली
यामध्ये डेव्हिड स्लिंग, एरो २ आणि ३ चा समावेश आहे. सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CSIS) च्या मते, डेव्हिड स्लिंगची रेंज ४० ते ३०० किलोमीटर आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे. हे दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे, ज्यामध्ये कोणतेही शस्त्रे नाही. हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना थेट धडक देत नष्ट करते, म्हणूनच त्याला हिट-टू-किल म्हणून ओळखले जाते.
एरो २ आणि ३ डिफेन्स प्रणाली
अमेरिकेसोबत इस्रायलने एरो २ आणि एरो ३ संरक्षण प्रणाली तयार केली जी डेव्हिड स्लिंग नंतर येते. दोन्ही संरक्षण यंत्रणा आंतरमहाद्विप क्षेपणास्त्रे नष्ट करण्यास सक्षम आहेत. कारण ते पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर वायूमंडळात प्रवास करतात. सीएसआयएसच्या मते, एरो २ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करू शकते. त्याची मारक क्षमता ९० किमी आहे आणि उंची ५१ किमी आहे. एरो ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हिट-टू-किल टेक्निकने मारून नष्ट करते. एप्रिलमध्ये इराणने केलेल्या हल्ल्यात तिन्ही संरक्षण यंत्रणा वापरण्यात आल्या होत्या.