इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 08:15 PM2024-10-27T20:15:33+5:302024-10-27T20:15:55+5:30
Iran-Israel War: इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार
Israel-Iran War: इस्रायल आणि हिजबुल्लाचा संघर्ष तीव्र झाला आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. आता इस्रायली सैन्याने एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, त्यांनी रविवारी (27 ऑक्टोबर) हिजबुल्लावर मोठा हल्ला करत दक्षिण लेबनॉनमध्ये त्यांचे तीन प्रमुख कमांडर ठार केले आहेत.
आयडीएफने बिंट जबेल प्रदेशातील हिजबुल्लाचा प्रमुख अहमद जाफर माटौक, त्याचा उत्तराधिकारी आणि त्याच भागातील तोफखाना प्रमुखाच्या हत्येची पुष्टी केली. इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हा हल्ला झाला. या तिन्ही कमांडरांनी बिंट जबील भागातून असंख्य दहशतवादी हल्ले निर्देशित केले होते, ज्यात इस्रायली नागरिकांवर आणि दक्षिण लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या इस्रायली सैन्यावर क्षेपणास्त्रे डागणे समाविष्ट आहे.
🔴 The Commander of Hezbollah’s Bint Jbeil Area, Ahmed Jafar Maatouk, was eliminated in an IAF strike.
— Israel Defense Forces (@IDF) October 27, 2024
A day later, the IAF also eliminated his successor and Hezbollah's head of artillery in the Bint Jbeil area.
These three terrorists directed and carried out numerous… pic.twitter.com/Hg8iasUA4X
इराणवर मोठा हल्ला
इस्रायलने शनिवारी (26 ऑक्टोबर) इराणवर मोठा लष्करी हल्ला केला. ज्यामध्ये इराणचे दोन सैनिक मारले गेले. यापूर्वी इराणने या हल्ल्यात किरकोळ नुकसान झाल्याचे म्हटले होते. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, एअर डिफेन्स बेसने या हल्ल्यानंतर सांगितले की, इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलच्या हल्ल्याचा यशस्वीपणे सामना केला. पण, या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे इस्रायकडून सांगण्यात येत आहे.