इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:55 PM2024-10-01T22:55:35+5:302024-10-01T23:11:43+5:30

Iran Attacks Israel: इराणचं समर्थन असलेल्या हिसबुल्लाहच्या प्रमुखाला इस्राइलने ठार मारल्यानंतर खवळलेल्या इराणने आज इस्राइलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्राइलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागले आहेत. तसेच इस्राइली नागरिकांनी सुरक्षेसाठी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. 

Iran jumps into war, massive attack on Israel with hundreds of missiles, excitement in Tel Aviv | इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ

इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ

मागच्या वर्षभरापासून इस्राइलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये आज अखेर इराणने उडी घेतली आहे. इस्राइलने वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धात सुरुवातीला हमास आणि मागच्या पंधरवडाभरात हिजबुल्लाह या संघटनांना लक्ष्य करून त्यांचे कंबरडे मोडले होते. दरम्यान, इराणचं समर्थन असलेल्या हिसबुल्लाहच्या प्रमुखाला इस्राइलने ठार मारल्यानंतर खवळलेल्या इराणने आज इस्राइलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्राइलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागले आहेत. तसेच इस्राइली नागरिकांनी सुरक्षेसाठी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार इराणकडून १०० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर हल्ला करण्यात आला.  या हल्ल्याबाबत माहिती देताना इस्राइल डिफेन्स फोर्सचे प्रवक्ते डॅनियस हगारी यांनी सांगितले की, इराणकडून इस्राइलच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्रे डागण्यात आली. यातील अनेक क्षेपणास्त्रे ही तेल अवीवपर्यंत पोहोचली आहेत. या हल्ल्यानंतर इस्राइलचा एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अलर्टवर आहे. नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इस्राइलवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणी सरकारी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेत इराणने इस्राइलला इशारा देताना सांगितले आहे की, जर इस्राइलने प्रत्युत्तरदाखल कारवाई केली तर इराणकडून दिलं जाणारं प्रत्युत्तर अधिक विध्वंसक असेल. संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणच्या प्रतिनिधींनी सांगितले की, इराणच्या सरकारने दहशतवादी हल्ल्यांविरोधात कायदेशीर आणि वैध प्रतिक्रिया दिली आहे.  

Web Title: Iran jumps into war, massive attack on Israel with hundreds of missiles, excitement in Tel Aviv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.