Zoo किपरला हल्ला करून मारल, नंतर प्राणिसंग्रहालयातून साथीदारासह फरार झाली सिंहीण अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:05 PM2022-01-31T21:05:42+5:302022-01-31T21:06:54+5:30
प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, "ही सिंहीण अनेक वर्षांपासून प्राणीसंग्रहालयात आहे. ती पिंजऱ्याचे दार उघडून बाहेर गेली अन्...
इराणमधील प्राणीसंग्रहालयातून (Zoo) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सिंहिणीने प्राणिसंग्रहालयाच्या किपरवरच (Zoo Keeper) हल्ला करून त्याला ठार केले आणि ती पकडण्यापूर्वीच तिच्या साथीदारासोबत फरार झाली. यासंदर्भात सोमवारी स्थानिक माध्यमाने माहिती दिली.
प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, "ही सिंहीण अनेक वर्षांपासून प्राणीसंग्रहालयात आहे. ती पिंजऱ्याचे दार उघडून बाहेर गेली आणि एका 40 वर्षीय गार्डवर हल्ला केला. कर्मचाऱ्याने सांगितले की, झू-कीपर या जोड्यासाठी अन्न घेऊन गेला होता. याच दरम्यान सिंहिणीने त्याच्यावर हल्ला केला."
साथीदारासोबत पकडली गेली सिंहीण -
कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 200 किलोमीटर (125 मैल) अंतरावर असलेल्या मरकाझी प्रांतातील अराक शहरातील प्राणीसंग्रहालयातून रविवारी दोन प्राणी आपल्या पिंजऱ्यातून पळून गेले होते. संबंधित प्रांताचे गव्हर्नर अमीर हादी यांनी सांगितले की, या घटनेनंतर, सुरक्षा दलांनी प्राणिसंग्रहालयाचा ताबा घेतला. सिंहीण आणि तिच्या साथीदाराला जिवंत पकडण्यात यश आले आहे.