इराणचा सैन्य दिवस - क्षेपणास्त्रं आणि तोफा गायब, वैद्यकीय उपकरणांसह संचलन 

By Meghana.dhoke | Published: April 20, 2020 02:45 PM2020-04-20T14:45:21+5:302020-04-20T14:51:45+5:30

सैन्यदिवसाचं संचलन, क्षेपणास्त्रं गायब, मोबाइल दवाखाने रस्त्यावर!

Iran natinal army day: displaysmedical eqipments not missiles amid corona virus outbreak- | इराणचा सैन्य दिवस - क्षेपणास्त्रं आणि तोफा गायब, वैद्यकीय उपकरणांसह संचलन 

इराणचा सैन्य दिवस - क्षेपणास्त्रं आणि तोफा गायब, वैद्यकीय उपकरणांसह संचलन 

googlenewsNext
ठळक मुद्देइराणने अनोख्या रितीनं साजरा केला आपला राष्ट्रीय सैन्य दिन.

इतिहासात नोंद होतेय, पुढच्या पिढय़ा आपलं उदाहरण देऊन सांगणार आहेत की, एककाळ असाही होता मानवी इतिहासात की दुनियेच्या तमाम देशांकडे अत्याधुनिक शस्त्रस्त्रं होती, काहींकडे तर आण्विक अस्त्रं बनवण्याची क्षमता होती, मात्र त्यांच्याकडे व्हेंटीलेटर्स नव्हते, माणसं मरत होती तर दवाखान्यात पलंग नव्हते, डॉक्टरांना सुरक्षा साधनं नव्हती. त्यांची सारी हत्यारंच फोल ठरली होती!’
एरव्ही हे फॉरवर्ड वाक्य विनोद, हताशा म्हणून सोडून देता आलं असतं, पण आज ती वस्तुस्थिती आहे.
वास्तव आहे ते चालू वर्तमानकाळाचं.
आणि ते किती बोचरं असावं याचं चित्र शुक्रवारी इराणमध्ये दिसलं.
17 एप्रिल हा इराणचा राष्ट्रीय सैन्य दिन. 
एरव्ही सैन्य दिन आणि म्हटल्यावर परेड अर्थात संचलन होतंच.
आपल्या देशाची संरक्षण सज्जता दाखवली जाते. डोक्यावर फायटर प्लेन भिरभिरतात. ते कसरती करतात. अत्याधुनिक हेलीकॉप्टर्स, आर्मर्ड व्हेइलक्स, तोफा, बंदुका,क्षेपणास्त्रं, पाणडुबी, बंदुका यासा:याचं प्रदर्शन केलं जातं.
आपल्या देशाची ताकद दाखवून देशवासियांना सांगितलं जातं की, घाबरुन नका, आपला देश संरक्षण सिद्ध आहे.
मात्र 17 एप्रिल 2क्2क् हा देश मानवी इतिहासात वेगळा म्हणून नोंदवला जाईल.
इराणच्या सैन्यानं संचलन केलं पण सैन्य एकटं नव्हतं.
ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं.
रस्त्यावर तोंडाला मुस्के बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती.
सोबत मोबाइल दवाखाने होते, डिसइन्फेशक्न व्हेइकल्स होती. कोरोनाच्या महामारीने सा:या इराणलाच पोखरलेलं असताना सैन्य देशवासियांना सांगत होतं की,
आम्ही तुमच्या मदतीला उतरलो आहेत. पण यावेळी जगवणारी साधनं वेगळी आहेत. बंदुका तोफांचा काही उपयोग नाही, आम्ही वेगळी शस्त्रं घेऊ न लढतो आहोत.
‘ डिफेंडर्स ऑफ द होमलॅण्ड, हेल्पर्स ऑफ द हेल्थ’ असं या परेडचं नाव होतं. छोटेखानी परेड झाली. ट्रेनिंग सेंटरपुरती मर्यादित होती.
कमांडर चेह:याला मास्क लावून शिस्तीत संचलन करत होते.
ही लढाई इराण जिंकणार का?


तर जिंकणार असं सांगत असताना इराणचे अध्यक्ष हसन रुहानी सांगतात, ‘ हे संचलन वेगळं आहे. शत्रू दिसत नाही, सैन्याचं काम यावेळी डॉक्टर्स आणि परिचारिका करत आहेत.’
खरंच इराणची लढाई मोठी आहे. इराणमध्ये बाधितांचा आकडा ( ही बातमी लिहित असताना) 8क्,868 इतका आहे. 5,क्31 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
कोरोनाशी लढून देश वाचवण्याचं मोठं आव्हान आज इराणचे सैनिक- त्यात डॉक्टर-परिचारिकाही आल्याच पेलत आहेत, झुंजत आहेत नव्या शस्त्रंनिशी.

Web Title: Iran natinal army day: displaysmedical eqipments not missiles amid corona virus outbreak-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.