इराण अणुचर्चा; मुदत नोव्हेंबर्पयत वाढविली
By admin | Published: July 20, 2014 02:03 AM2014-07-20T02:03:30+5:302014-07-20T02:03:30+5:30
इराणच्या अणुकार्यक्रमावरील इराण आणि सहा राष्ट्रांतील वाटाघाटींना 20 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी तोडगा काढता आला नाही.
Next
वॉशिंग्टन/व्हिएन्ना : इराणच्या अणुकार्यक्रमावरील इराण आणि सहा राष्ट्रांतील वाटाघाटींना 20 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी तोडगा काढता आला नाही. त्यामुळे आता या वाटाघाटींची मुदत 24 नोव्हेंबर्पयत वाढविण्यात आली आहे.
युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाच्या मुख्य प्रतिनिधी कॅथरिन अॅश्टन आणि इराणचे परराष्ट्रमंत्री मोहंमद जावेद झारीफ यांनी व्हिएन्ना येथे एका संयुक्त निवेदनाद्वारे वाटाघाटींच्या मुदतवाढीची घोषणा केली.
24 नोव्हेंबर 2क्13 रोजी मान्य करण्यात आलेला संयुक्त कृती आराखडा स्वीकारून उभय पक्षांनी त्याची सुरळीतपणो अंमलबजावणी केल्याने राजकीय पातळीवरील प्रयत्नांना गती मिळाली. याचा लाभ उठवत आम्ही संयुक्त र्सवकष कृती आराखडा निश्चित करण्यासाठी अथक काम केले, असे या निवेदनात म्हटले आहे.
इराण आणि अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, युरोपियन युनियन यांच्यातील कठीण वाटाघाटीनंतर हे निवेदन जारी करण्यात आले. अलीकडच्या या वाटाघाटी व्हिएन्ना येथे दोन आठवडे सुरू होत्या. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतची आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता दूर करण्यासाठी 2क् जूनर्पयत करार करण्याचे उभय पक्षांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये मान्य केले होते. (वृत्तसंस्था)