इराण-पाकिस्तानने वाढविले जगाचे टेन्शन, हवाई हद्दीतूनच प्रतिहल्ला, पाकचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 07:56 AM2024-01-19T07:56:05+5:302024-01-19T07:56:20+5:30
गाझा पट्टीतील हमासवरील इस्रायलच्या युद्धामुळे आणि येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानंतर इराण-पाकिस्तानातील जशास तसे हल्ल्यांमुळे अस्थिर प्रदेशात तणाव वाढला आहे.
इस्लामाबाद : इराणच्या सीमावर्ती भागातील हल्ले पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी राखीव श्रेणीतील युद्धसामग्रीचा वापर करून केले. विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतच राहून ही कारवाई केली, मानवरहित विमानांद्वारे (ड्रोन) एकूण सात ठिकाणांना लक्ष्य केले गेले. ही लक्ष्ये इराणच्या हद्दीत ८० किलोमीटर अंतरावर होती, असे एका सूत्राने सांगितले. गाझा पट्टीतील हमासवरील इस्रायलच्या युद्धामुळे आणि येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानंतर इराण-पाकिस्तानातील जशास तसे हल्ल्यांमुळे अस्थिर प्रदेशात तणाव वाढला आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तेहरानचा निषेध इस्लामाबादपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हल्ल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्रालयाने पाकिस्तानी राजदूताला पाचारण केले होते, असे वृत्त इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने दिले आहे. इराणी सुरक्षा अधिकारी चौकशी करत आहेत. प्रांतीय राजधानी जाहेदानच्या आग्नेयेला ३४७ किमी अंतरावर असलेल्या सारवण शहराजवळही स्फोट झाला, जिथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इराणने दखल न घेतल्याने प्रत्युत्तर
इस्लामाबादने इराणमध्ये पाकिस्तानी वंशाच्या दहशतवाद्यांच्या तळांबद्दल सातत्याने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तथापि, आमच्या गंभीर चिंतेवर कारवाई न केल्यामुळे या तथाकथित गनिमांनी निर्दोष पाकिस्तानींचे रक्त सांडणे सुरूच ठेवले.त्यामुळे या अतिरेक्यांविरोधात आजची कारवाई करण्यात आली, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले.