चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:46 AM2020-07-21T11:46:07+5:302020-07-21T11:52:49+5:30
इराणच्या परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी या वृत्तांचा निषेध करत या अहवालामागे कारस्थान असल्याचे सांगितले. हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जहांदानदरम्यान बांधला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी इराणनेभारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा हा परिणाम असल्याचीही त्यावेळी चर्चा होती. पण आता इराणने असं काहीही झालेलं नसून ते वृत्त फेटाळून लावलं आहे. इराणकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे असून, त्यात भारत चाबहार जहांदान रेल्वे प्रकल्पाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळण्यात आल्याच्या मीडियाच्या वृत्ताचे इराणने खंडन केले. इराणच्या परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी या वृत्तांचा निषेध करत या अहवालामागे कारस्थान असल्याचे सांगितले. हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जहांदानदरम्यान बांधला जाणार आहे.
गेल्या आठवड्यात इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी 628 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे उद्घाटन केले. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. द हिंदूच्या अहवालानुसार हा प्रकल्प मार्च २०२२पर्यंत पूर्ण होणार आहे. असे म्हटले जात होते की, भारत त्यासाठी पैसे देत नाही, असे सांगत इराणने या करारामधून भारताला वगळलं.
हा करार 2016मध्ये झाला होता
2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण दौर्यादरम्यान चाबहार करारावर स्वाक्षरी झाली होती. संपूर्ण प्रकल्पात सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. इरकॉनचे अभियंतेदेखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इराण येथे गेले, परंतु अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताने रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केलेले नव्हते. अमेरिकेने चाबहार बंदरासाठी सवलती दिल्या आहेत, पण उपकरण आणि पुरवठादार अद्यापही उपलब्ध नाहीत.
इराण आणि चीनमध्ये वाटाघाटी
दुसरीकडे इराण आणि चीन लवकरच मोठ्या करारावर तडजोड करू शकतात. त्याअंतर्गत चीन इराणकडून अत्यंत स्वस्त दराने तेल खरेदी करेल, तर त्या बदल्यात बीजिंग इराणमध्ये 400 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. एवढेच नव्हे तर इराणला सुरक्षा आणि प्राणघातक आधुनिक शस्त्रे पुरवण्यातही ड्रॅगन मदत करणार असल्याची माहिती आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इराण आणि चीनमधील 25 वर्षांच्या सामरिक करारावरील वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत.
हेही वाचा
देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार
आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती
दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही
"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"
भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'
सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित