युद्ध भडकलं तर त्या आगीत अमेरिका जळेल, इराणची धमकी; हल्ला झाला तर..., US चाही थेट इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 04:21 PM2023-10-28T16:21:41+5:302023-10-28T16:23:42+5:30

इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. 

Iran threatens If war breaks out America will burn in that fire, US direct warning | युद्ध भडकलं तर त्या आगीत अमेरिका जळेल, इराणची धमकी; हल्ला झाला तर..., US चाही थेट इशारा!

युद्ध भडकलं तर त्या आगीत अमेरिका जळेल, इराणची धमकी; हल्ला झाला तर..., US चाही थेट इशारा!

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीसह लेबनानमधील दहशतवादी संघटनांवरही जबरदस्त बॉम्बिंग सुरू आहे. याच बरोबर, दोन आघाड्यांवर युद्ध लढत असलेल्या इस्रायलला आतापर्यंत इराण केवळ इशाराच देत होता. मात्र आता त्याने थेट युद्धात उडी घेण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. 

इराणची अमेरिकेला धमकी -
इराणने, इस्रायलची ढाल बनून उभ्या असलेल्या अमेरिकेलाही युद्धाच्या आगीत जाळण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रात अमेरिकन लष्कराची तैनाती वाढत आहे. याच बरोबर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आधीच म्हटले आहे की, इराण अथवा त्याच्या समर्थक दहशतवादी संघटनांनी कुठल्याही अमेरिकन नागरिकावर हल्ला केला, तर आपल्या लोकांचे संरक्षण कसे करावे? हे अमेरिकेला माहीत आहे.

अमेरिकेचा इशारा -
अमेरिकेला इराणसोबत युद्ध नको आहे. मात्र, इस्रायलजवळ पाठवण्यात आलेली अमेरिकन विमानं आणि लष्करी जहाजांची तैनाती पाहूनच इराणने संकेत समजून घ्यायला हवा, असे इशारा अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रात दिला आहे.

आपल्या नागरिकांना शस्रास्त्र वाटतोय इस्रायल -
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 21 दिवसांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत जवळपास 9 हजार लोक मारले गेले आहेत. हे युद्ध आता आणखी रौद्र रूप धारण करण्याची चिन्ह आहेत. आता इस्रायलने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करायला सुरुवात केली आहे. इस्रायल त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देणार आहे. इस्रायलचे पोलीसमंत्री इतामार बेन ग्विर यांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्कलोनमधील नागरिकांना शस्त्रास्त्रे वाटली आहेत. तसेच, युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.
 

Web Title: Iran threatens If war breaks out America will burn in that fire, US direct warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.