पुढील ४८ तासांत 'या' २ देशांमध्ये युद्ध पेटणार?; अमेरिकेसह आखाती देशात हायअलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 08:13 PM2022-11-02T20:13:09+5:302022-11-02T20:13:24+5:30

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनीही ही माहिती दिली. या प्रकरणामुळे अमेरिका चिंतेत असल्याचे नेड प्राइस यांनी सांगितले.

Iran to attack Saudi Arabia within 48 hours?; High alert in Gulf countries including the US | पुढील ४८ तासांत 'या' २ देशांमध्ये युद्ध पेटणार?; अमेरिकेसह आखाती देशात हायअलर्ट

पुढील ४८ तासांत 'या' २ देशांमध्ये युद्ध पेटणार?; अमेरिकेसह आखाती देशात हायअलर्ट

googlenewsNext

इराण लवकरच सौदी अरब किंवा इतर कोणत्याही आखाती देशावर हल्ला करू शकतो. अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या गुप्तचर यंत्रणांनी सावधतेचा इशारा दिला आहे. ही माहिती मिळताच सौदी अरेबिया आणि अमेरिकेसह अनेक प्रादेशिक देशांचे सैन्य हाय अलर्टवर आहे. हिजाबच्या प्रदर्शनावरून जगाचे लक्ष वळवण्यासाठी इराण हल्ल्याच्या तयारीत असल्याचे गुप्तचरांनी सांगितले आहे. त्याचवेळी, न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, इराण पुढील ४८ तासांतच सौदी अरेबियावर हा हल्ला करू शकतो. इराण लवकरात लवकर ४८ तासांच्या आत हल्ला करू शकतो असं इंटेलिजन्स इनपुटची पुष्टी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने एपीला सांगितले. 

मात्र, अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्था पेंटागॉनच्या प्रवक्त्याने सौदी अरेबियासह इतर देशांतील अलर्टचा इशारा फेटाळून लावला. मात्र अमेरिका सतत सौदी अरेबियाच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनीही ही माहिती दिली. या प्रकरणामुळे अमेरिका चिंतेत असल्याचे नेड प्राइस यांनी सांगितले. अमेरिका लष्करी, राजनयिक आणि गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या संपर्कात आहे. असे काही घडल्यास या प्रदेशातील स्वत:चे आणि मित्रपक्षांचे हित जपण्यासाठी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा अमेरिकेने दिला. 

इराणमध्ये महिलांचं हिजाब प्रदर्शन
सध्या इराणमध्ये महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी हिजाब नीट न घातल्यामुळे अटक केली होती, त्यानंतर तिचा कोठडीत मृत्यू झाला. तेव्हापासून इराणमध्ये हजारो लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत. या निदर्शनात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराण सरकारने या निदर्शनामागे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा हात असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसोबत हिजाबचे प्रदर्शन घडवून आणलं आहे. गेल्या काही वर्षांत इराणने अशी अनेक लष्करी पावले उचलली आहेत. ज्यामुळे सौदी अरबसोबत आखती देशांशी इराणचा तणाव सुरू आहे. सप्टेंबरमध्ये इराकच्या कुर्दिश परिसरात इराणकडून ७० मिसाईल डागण्यात आली होती. इराकमध्ये अमेरिकेन सैन्य तैनात आहे. 

अमेरिका आणि सौदी अरबमध्येही ठीक नाही
इराणकडून हल्ल्याच्या नियोजनाची माहिती अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिका आणि सौदी अरेबियामधील संबंध तणावपूर्ण आहेत. वास्तविक, अमेरिकेत मध्यावधी निवडणुका येणार आहेत. निवडणुकीपूर्वी सौदीचे वर्चस्व असलेल्या ओपेक प्लस संघटनेने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना हे कोणत्याही परिस्थितीत नको होते.

तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेक प्लसच्या निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता सौदी अरेबियासोबतच्या संबंधांवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. मात्र, सौदी अरेबियाने अमेरिकेच्या तीव्र नाराजीनंतर स्पष्टीकरण देत हा निर्णय पूर्णपणे आर्थिक संबंध असल्याचं म्हटलं होतं. या निर्णयामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे सौदीकडून सांगण्यात आले.

Web Title: Iran to attack Saudi Arabia within 48 hours?; High alert in Gulf countries including the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.