कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 02:07 PM2023-12-27T14:07:52+5:302023-12-27T14:08:44+5:30
जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे.
इराणनं त्यांचा कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलविरोधात एक खतरनाक प्लॅन बनवला आहे. इराणनं आत्मघाती हल्ल्याच्या माध्यमातून इस्त्रायला हादरवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी अफगाणी दहशतवाद्यांची भरती करत आहे. सूत्रांनुसार, अफगाणी दहशतवाद्यांकडून इस्त्रायलवर आत्मघाती हल्ले केले जातील. गाझा युद्ध आणि सीरियातील इस्त्रायली स्ट्राईकनं भडकलेल्या इराणनं जगभरातील इस्त्रायली ठिकाणांना टार्गेट करण्याचं प्लॅनिंग केले आहे. इराण इस्त्रायलवर आत्मघाती हल्ले करू शकते. त्यासाठी ही प्लॅनिंग करण्यात येत आहे.
सूत्रांनुसार, जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे. आयआरजीएसच्या फोर्सची ४०० इस्त्रालयी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.ज्याठिकाणी हे आत्मघातकी हल्ले करण्याची योजना आहे. त्यासाठी बेकायदेशीरपणे अफगाणी दहशतवाद्यांना भरती केले जात आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या स्ट्राईकनं संतापलेल्या इराणनं बदला घेण्याचं ठरवलं आहे.
मीडिल ईस्टच्या अमेरिकन ठिकाणांवरही इराणच्या प्रॉक्सी संघटनांकडून सातत्याने हल्ला होत असून त्यामुळे इस्त्रायल, अमेरिकेच्या प्रत्युत्तराने भीषण युद्धाचे संकेत दिसत आहेत. सीरियाचा इराणी कमांडरचा मृत्यू झाल्याने इब्राहिम रईसीने महायुद्धाचे संकेत दिलेत. इराणी कमांडर सैयद रजी मोसावीच्या सीरियातील हत्येनंतर पूर्ण इराणमध्ये जबरदस्त आक्रोश आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री उघडपणे इस्त्रायलला उद्ध्वस्त करू अशी धमकी देत आहेत. मोसावीच्या हत्येनंतर इराणमध्ये ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. त्यामुळे इराण बदला घेण्याची योजना आखत आहे.
भारतापर्यंत पोहचली युद्धाची झळ
गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचली आहे. तांबडा समुद्र सध्या युद्धभूमी बनला आहे. इराण समर्थक हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हमासला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या हुतींनी जाहीर केले आहे की, जे जहाज इस्रायलला जात आहेत किंवा इस्त्रायलशी संबंधित आहे, त्यांना ते लक्ष्य करतील.