इराणने तयार केले स्वतःचे फायटर जेट, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:12 PM2018-08-21T16:12:03+5:302018-08-21T16:28:59+5:30

अमेरिकेने करार समाप्त करुन इराणवर निर्बंध लादल्यानंतर इराणही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे.

Iran unveils first fully-indigenous fighter jet | इराणने तयार केले स्वतःचे फायटर जेट, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी

इराणने तयार केले स्वतःचे फायटर जेट, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी

Next

तेहरान- इराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्य़ात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इराम यांचे संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर इराण अनेक मार्गांनी आपली संरक्षणसिद्धता दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहे.





हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे, त्यात बहुउद्देशिय रडार बसविण्यात आल्याचा दावा तास्मिन न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
इराणच्य़ा सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने या विमानाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. शनिवारी या विमानाची घोषणा  करण्यात आली. संरक्षणमंत्री आमीर हतामी यांनी या विमानाची घोषणा केली.





या विमानाबद्दल माहिती देताना हतामी म्हणाले, इराकबरोबर युद्धाच्यावेळेस जालेल्या हवाईयुद्धामध्ये इराणचे नुकसान झाले होते, त्यामुळे असे विमान तयार करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. इराणला इस्रायलकडून सतत असणारी हल्ल्याची भीती तसेच इराणबरोबर 'सर्व पर्याय विचारात आहेत' असे म्हणणाऱ्या अमेरिकेमुळेही हे विमान तयार करावे लागले.
इराण-इराक युद्धामुळे आम्ही कोणावरही अवलंबून राहू शकत नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे, आमच्याकडील संसाधने मर्यादित आहेत, त्यामुळे आम्हाला संरक्षणासाठी कमीत कमी खर्चात प्रयत्न करावे लागणार होते असे हतामी यांनी सांगितले.

अमेरिकेची पाठ वळताच चीनची इराणमध्ये घुसखोरी
अमेरिकेने इराणबरोबरचा करार रद्द केल्यानंतर चीनने इराणशी संबंध वाढवायला सुरुवात केली आहे.
जून 2017पर्यंत चीनने 33 अब्ज डॉलर्सची इराणमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच पाणीपुरवठा, ऊर्जा, वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी 10 अब्ज डॉलर्सची मदतही चीनने इराणी बँकांना केली आहे. तसेच बुशहेर या बंदरापासून इराणमधील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी 70 कोटी डॉलर्सची मदतही चीनने केली आहे. इराणमधील नैसर्गिक वायूक्षेत्रातून फ्रेंच कंपनीने माघार घेतली तर त्याची जागा घेण्यासाठी चीन तयारच आहे. चीन हा क्रूड ऑइल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. इराण हा चीनला तेलाची निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचा सर्वात जास्त तोटा युरोपियन कंपन्यांना होणार आहे.
 

Web Title: Iran unveils first fully-indigenous fighter jet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.