इराणच्या मशिदीवर फडकला लाल झेंडा, काय आहे त्याचा अर्थ?; अरबी भाषेत दिला 'हा' संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:24 PM2024-08-01T12:24:40+5:302024-08-01T12:25:30+5:30

गेल्या ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण हल्ल्यात १२०० जण ठार झाले, तर २५० जणांना ओलिस ठेवले होते. तेव्हापासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष पेटला आहे.

iran vs israel: Red flag hoisted over Iranian mosque, what does it mean?; This message was given in Arabic | इराणच्या मशिदीवर फडकला लाल झेंडा, काय आहे त्याचा अर्थ?; अरबी भाषेत दिला 'हा' संदेश

इराणच्या मशिदीवर फडकला लाल झेंडा, काय आहे त्याचा अर्थ?; अरबी भाषेत दिला 'हा' संदेश

इस्रायलने नुकतीच हमास प्रमुख इस्माइल हानिया यांची हत्या केली. इस्त्रायलनं ७ ऑक्टोबरला त्यांच्या देशात झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. हानियांची हत्या गाझा, पॅलेस्टाईन किंवा कतारमध्ये झाली नसून इराणची राजधानी तेहरानमध्ये झाली आहे. इराणनं तेहरानमध्ये त्यांच्या घरालाच उद्ध्वस्त केले ज्यात इस्माइल हानिया राहत होते. त्यानंतर इराणनं जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवला आहे. या झेंड्याचा अर्थ काय, इराण त्यातून काय संदेश देऊ इच्छितो हे जाणून घेऊ.

ज्या मशिदीवर लाल रंगाचा झेंडा फडकवला ती जामकरण मशीद आहे. ही मशीद इराणची राजधानी तेहरानपासून १२० किमी अंतरावरील कोममध्ये आहे. कोम हे इराणचं पवित्र शहर मानलं जातं. या मशिदीचं इराणमध्ये खूप महत्त्व आहे. एकच ही मशीद देखील खास आहे कारण तिला एकच घुमट आहे. ही मशीद शिया मुस्लिमांसाठी तीर्थक्षेत्र आहे. ज्याठिकाणी इराणच्या विविध ठिकाणांवरून लोक येत असतात. शिया मुसलमानांचे १२ वे इमाम मादी यांच्या आदेशावर हसन बिन मसला यांनी याचं बांधकाम केले होते.

लाल झेंड्यामागची कहाणी काय?

इराणची ही मशीद नेहमी जगभरात लाल रंगाच्या झेंड्यामुळे चर्चेत राहते. मशिदीवर लाल झेंडा फडकवल्याचं हे पहिल्यांदाच घडलं नाही तर याआधी बऱ्याचदा तसं झालं आहे. हा लाल रंगाचा ध्वज अशावेळी फडकवला जातो जेव्हा जेव्हा इराणमध्ये कुणाचा मृत्यू अथवा हल्ल्याचा बदला घेतल्याची घोषणा केली जाते. लाल झेंडा म्हणजे एलान ए जंग आहे म्हणजे युद्धाचं बिगुल वाजलं आहे.

या झेंड्यावर अरबी भाषेत या ला थारत अल हुसैन असं लिहिलं आहे. ज्याचा अर्थ ऐ हुसैन का बदला लेने वालो, हा झेंडा फडकवून इराणकडून मेसेज दिला गेला आहे. आता इराण त्यांच्याकडील मृत्यूचा बदला घेणार आहे. म्हणजे आता आणखी  इस्त्रायलशी बदला घ्यायचा आहे. अलीकडच्या काळात अनेकदा लाल झेंडा फडकवला गेला. २०२० च्या सुरुवातीला इराणी फोर्सचे मुख्य कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर हा झेंडा फडकवला होता. त्यावेळी सुलेमानी इराकमध्ये अमेरिकन एअर स्ट्राईकमध्ये मारले गेले होते. २०२४ च्या सुरुवातीलाही लाल झेंडा फडकवला. त्यावेळी कासिम सुलेमानी यांच्या वर्षश्राद्धावेळी बॉम्बस्फोट झाला होता. तेव्हा इराणनं बदला घेण्याची शपथ घेतली होती.
 

Web Title: iran vs israel: Red flag hoisted over Iranian mosque, what does it mean?; This message was given in Arabic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.