इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:49 AM2024-05-21T06:49:41+5:302024-05-21T06:50:21+5:30

इब्राहिम रईसी व अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष आलियेव यांच्याहस्ते रविवारी एका धरणाचे उद्घाटन केले. तेथून परतताना इराणच्या सीमेजवळ त्यांचे हेलिकॉप्टर रात्री कोसळले.

Iranian President Ibrahim Raisi dies in helicopter crash; Officials including the Foreign Minister are also included in the dead | इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश

दुबई : इराणच्या वायव्येकडील डोंगराळ भागात रविवारी रात्री झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातराष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (वय ६३) यांच्यासह परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दोल्लाहियान, काही अधिकारी व अंगरक्षकांचा मृत्यू झाला. इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वात व राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या आदेशानुसार गेल्या महिन्यात इराणच्या सैन्याने इस्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला चढविला होता.

इब्राहिम रईसी व अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष आलियेव यांच्याहस्ते रविवारी एका धरणाचे उद्घाटन केले. तेथून परतताना इराणच्या सीमेजवळ त्यांचे हेलिकॉप्टर रात्री कोसळले. इसायलशी सुरू केलेला संघर्ष, अमेरिकेबरोबर वाढलेले शत्रुत्वाच्या काळात हेलिकॉप्टर दुर्घटना होऊन राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू होणे हा इराणसाठी मोठा धक्का आहे. 
रईसी यांचा अपघाती मृत्यू धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी उमटली आहे. इजिप्त, जॉर्डन, सीरिया या देशांनीही इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच यानिमित्त भारताने उद्या, मंगळवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.  

अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
रविवारी रात्री झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. तुर्कस्थानच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी एक ड्रोन फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले. 

मोहम्मद मोखबर 
हंगामी राष्ट्राध्यक्ष
इराणचे उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोखबर यांची हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी निवड केली. रईसी यांच्या मृत्यूनंतर खामेनी यांनी ही घोषणा केली. 

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. इराण-भारतातील संबंध दृढ होण्यात रईसी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. 

तेलाच्या, सोन्याच्या किमतीत वाढ
नवी दिल्ली : इब्राहिम रईसी यांच्या अकस्मात मृत्यूमुळे खनिज तेल व सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्याची किंमत १.१ टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस २४४०.५९ डॉलरवर पोहोचली आहे.

Web Title: Iranian President Ibrahim Raisi dies in helicopter crash; Officials including the Foreign Minister are also included in the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.