इराणच्या संसदेत गोळीबार, सात जणांचा मृत्यू

By admin | Published: June 7, 2017 12:12 PM2017-06-07T12:12:40+5:302017-06-07T14:17:02+5:30

इराणी संसद आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळावळ झालेल्या हल्ल्यामध्ये 7 व्यक्तींनी प्राण गमावले आहेत. इराणी संसदेतील सूत्रांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार इराणी संसदेत 7 व्यक्ती ठार झाल्या असून संसदेच्या वरच्या मजल्यावर अद्याप 4 जणांना ओलीस ठेवण्यात आलेले आहे.

Iran's fishermen killed, seven deaths | इराणच्या संसदेत गोळीबार, सात जणांचा मृत्यू

इराणच्या संसदेत गोळीबार, सात जणांचा मृत्यू

Next
ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 07 -  इराणी संसद आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळाजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये 7 व्यक्तींनी प्राण गमावले आहेत. इराणी संसदेतील सूत्रांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार इराणी संसदेत 7 व्यक्ती ठार झाल्या असून संसदेच्या वरच्या मजल्यावर अद्याप 4 जणांना ओलीस ठेवण्यात आलेले आहे. मात्र संसदेच्या सुरक्षा विभागाने अद्याप या माहितीला दुजोरा दिलेला नाही. संसदेवर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला असून ते अजूनही संसदेच्या इमारतीमध्ये आहेत. त्यापैकी दोघांकडे एके 47 रायफल असून एकाकडे हॅंडगन असल्याचे समजते. खोमेनी स्मृतीस्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये एका महिलेने स्वतःला उडवून दिल्याचे स्थानिक माध्यमांद्वारे सांगण्यात आले.
येथील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोर संसदेच्या आवारात  घुसले. त्यानंतर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. हल्लेखोर आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक सुरु असून काही लोकांना हल्लोखारांनी ओलीस ठेवल्याचे समजते. याचबरोबर, दुसरीकडे येथील दक्षिण तेहरानमधील खोमेनी स्मृतीस्थळाजवळ सुद्धा हल्लेखोरांनी हल्ला केला. इराणच्या लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. 
 
इराणच्या संसदेबद्दल-
इराणच्या संसदेला इस्लामिक कन्सल्टेटीव्ह असेम्ब्ली म्हणजेच मजलिस ए शूरा ए इस्लामी असे म्हटले जाते. सध्या इराणी संसदेमध्ये 290 सदस्य निवडून दिले जातात. इराणी संसदेची स्थापना 1906 साली करण्यात आली. सध्या असणारे संसदेचे स्वरुप 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर बदलण्यात आले. सध्या वापरात असलेली इराणी संसदेची ही तिसरी इमारत आहे. आज इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या कबरीजवळच्या परिसराचाही समावेश आहे. हा परिसर तेहरानच्या दक्षिणेस बेहेश्त ए जाहरा या स्मशानभूमीजवळ आहे. यामध्ये रुहोल्ला खोमेनी यांच्या कबरीसह त्यांची पत्नी खादिजा सखाफी, द्वितीय पुत्र  अहमद खोमेनी, माजी अध्यक्ष अकबर हाशेमी रफस्नजनी, माजी उपराष्ट्रपती हसन हबिबी यांच्याही कबरी आहेत. खोमेनी यांच्या निधनानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1989 साली या परिसराचे बांधकाम सुरु करण्यात आले. या कबरींच्या समुहाचा हा परिसर 5000 एकर इतका विस्तृत असून या परिसरात दररोज हजारो लोक, पयर्टक भेट देत असतात. 20,000 गाड्या पार्क करता येतील अशी व्यवस्थाही येथे करण्यात आलेली आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी इराणने 2 अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Iran's fishermen killed, seven deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.