इराणच्या मिसाईल हल्ल्यात अमेरिकेचे 34 सैनिक गंभीर; पहिल्यांदाच खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 10:44 AM2020-01-25T10:44:09+5:302020-01-25T10:48:33+5:30
इराणने हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’ असे ट्वीट करत काहीही झाले नसल्याचे भासविले होते.
वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानीला अमेरिकेने ठार केल्यानंतर इराण संतप्त झाला होता. यामुळे त्यांनी दुसऱ्य़ाच दिवशी अमेरिकेच्या इराकमधील हवाई तळांवर हल्ले चढविले होते. यामध्ये इराणने अमेरिकेचे 80 च्या वर सैनिक जखमी झाल्याचा दावा केला होता. अमेरिकेने तो फेटाळला होता. मात्र, आज अमेरिकेने या हल्ल्यात 34 सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केले आहे.
इराणने हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’ असे ट्वीट करत काहीही झाले नसल्याचे भासविले होते. आज इराणच्या हल्ल्यात अमेरिकेने मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यामध्ये 34 सैनिकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यापैकी 8 जवानांना जर्मनीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. हे जवान अमेरिकेला परतले आहेत. तर अद्यापही 9 जवानांवर उपचार सुरू आहेत.
Pentagon (U.S. Department of Defense) says 34 US troops diagnosed with traumatic brain injuries from Iranian missile strike on 8th January on Iraqi air base: The Associated Press
— ANI (@ANI) January 24, 2020
इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले होते. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाला होता. तीन जानेवारीला हा हल्ला करण्यात आला होता.
अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार; बगदादच्या विमानतळावर हल्ला
कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...
होय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली