ट्रम्प यांना इराणचं उत्तर, इराणमध्ये अमेरिकींना नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2017 10:39 AM2017-01-29T10:39:58+5:302017-01-29T12:12:10+5:30
अमेरिकेच्या कारवाईला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या नागिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
तेहरान,दि.29 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या 7 देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. अमेरिकेच्या या कारवाईला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी केली आहे.
इराणच्या परराष्ट्रमंत्रालयाने शनिवारी याबाबत माहिती दिली. अमेरिकेने घेतलेला निर्णय अवमानकारक असून आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारा आहे, असं इराणकडून सांगण्यात आलं आहे. जोपर्यंत इराणवर अमेरिकेद्वारे घालण्यात आलेली बंदी हटवण्यात येत नाही तोपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेश देणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्हिसा पॉलिसीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ‘विदेशी अतिरेक्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा’ असे या आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार इराण, इराक, सुदान, सिरिया, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना ३0 दिवसांपर्यंत अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही.