इराणच्या उपराष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण; WHO ने दिले नियंत्रणाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 10:00 PM2020-02-27T22:00:46+5:302020-02-27T22:03:10+5:30

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे.

Iran's vice president also infected from Corona Virus; WHO provided epidemiological indications hrb | इराणच्या उपराष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण; WHO ने दिले नियंत्रणाचे संकेत

इराणच्या उपराष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण; WHO ने दिले नियंत्रणाचे संकेत

googlenewsNext

तेहरान : इराणच्या उपराष्ट्रपती मसूमेह इब्तेकर यांना जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झाली असून देशातील संक्रमित रुग्णांची संख्या 245 वर पोहोचली आहे. तर 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. 


चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 2,802 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 82,059 लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. तसेच चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाच्या संसर्ग झाला आहे. 


या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना WHO ने महामारी नियंत्रणात आल्याचे संकेत दिले आहेत. WHO चे प्रमुख टैड्रास अॅडनॉम गैबरेयेसस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आता निर्णायक वळणावर आला आहे. या व्हायरसमुळे प्रभावित असलेल्या देशांनी लवकरात लवकर निपटण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. असे झाल्यास लागण झालेल्या लोकांना वाचविता येईल.

अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही उपचार न घेता या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या 17 दिवसांच्या बाळाच्या शरीरात कोरोना व्हायरस नसून त्याचं आरोग्य उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. सीओ सीओ (Xiao Xiao) असं या बाळाचं नाव आहे. चीनमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गर्भातच बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला. 
 

Web Title: Iran's vice president also infected from Corona Virus; WHO provided epidemiological indications hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.